एअर इंडियाचा मॅनेजर उद्धव ठाकरेंना महिन्याकाठी 25 लाख रूपये द्यायचा; राणेंचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एअर इंडियाचा (Air India) मॅनेजर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) महिन्याकाठी 25 लाख रूपये द्यायचा असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे. शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांचा ‘शिवसेना लोकाधिकार आणि मी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी नारायण राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित होते.

नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी माझं तोंड उघडायला लावू नये. अन्यथा ‘मातोश्री’चा दरवाजा उघडणार नाही. एअर इंडियाचा मॅनेजर उद्धव ठाकरेंना महिन्याला 25 लाख रूपये द्यायचा. तसेच ज्यावेळी सहारा हॉटेलमधून 140 मराठी कामगारांना काढण्यात आलं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दगडफेक करायला लावली आणि बदल्यात तडजोड करत एका कामगारामागे 4 लाखांप्रमाणे 7 कोटी रूपये घेतले असा आरोप करत नारायण राणेंनी खळबळ उडवून दिली आहे.

शिवसेना जन्माला आली तेव्हा उद्धव ठाकरे 8 वर्षांचे होते. तेव्हा रुमाल पण सोबत नव्हता असं म्हणत नारायण राणेंनी खिल्ली उडवली आहे. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करत असताना संजय दत्तचेही नाव घेतलं. संजय दत्त सुद्धा मातोश्रीवर बॅग घेऊन आला होता. ते पण बॅग ओढत घेऊन आला होता. तो आला कसा? संजय दत्त बॅग घेऊन कुठल्या गेटने आत आला होता, हे सुद्धा माहिती आहे अस म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना एकप्रकारे इशारा दिला.