शिवसेनेत एकही पुरुष शिल्लक नाही…; राणेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचे पडसाद नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उमटले. या प्रकरणावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे आ. आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “आदित्य ठाकरे निर्दोष आहेत तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या वडिलांना अर्थात नारायण राणेंना माझ्या मुलाला वाचवा असा फोन का केला होता,” असा खळबळजनक दावा राणेंनी केला. असे असताना केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाला डिवचले आहे. शिवसेनेत एकही पुरुष शिल्लक नाही, असा हल्लाबोल राणेंनी केला आहे.

नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या दिवशी उद्धव ठाकरे हे छाताडावर नाचू असू म्हटले होते. मात्र, या मोर्चाला अजिबात गर्दी दिसली नाही. दिशा सालियान आणि सुशांत राजपूत यांची हत्या आहे. ही माझी ठाम भूमिका आहे. या दोघांची आत्महत्या नसून ही हत्याच आहे. सुशांत सिंह यांची हत्या होताना आणि दिशा सालियान वर अत्याचार होताना काही लोकांनी पाहिलं आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे.

सुशांत सालियान आणि दिशा शालियानच्या हत्येमध्ये आदित्य ठाकरे आरोपी आहेत. आदित्य ठाकरे तिथं उपस्थित होते असं मला अधिकाऱ्यांनी सांगितलं. सगळ्या बाजूनं याची चौकशी होईल. आवाज देखील तपासला जाईल. फक्त मोबाईल सापडला पाहिजे. 302 लागल्यानंतर ठाकरे आणि मातोश्रीत राहतो म्हणून नवीन कायदा आहे का तपासून पाहावं लागेल, असे राणे यांनी म्हंटले.