Narayan Rane on Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाला नारायण राणेंचा विरोध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Narayan Rane on Maratha Reservation । मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून मराठा बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र राठा समाज आरक्षणासंबंधी राज्‍य सरकारने घेतलेल्‍या निर्णयाशी आपण सहमत नसून यामुळे मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्‍याने मत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलं आहे. राणे यांनी एकप्रकारे राज्य सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेनंतर सरकारमधील नेते आणि मंत्री नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे बघितल पाहिजे.

याबाबत नारायण राणे यांनी ट्विट करत म्हंटल, मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्‍य सरकारने घेतलेल्‍या निर्णयाशी आणि दिलेल्‍या आश्‍वासनाशी मी सहमत नाही. यामध्‍ये ऐतिहासिक परंपरा असलेल्‍या मराठा समाजाचे खच्‍चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्‍याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. उद्या सोमवार दि. 29 जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्‍तर बोलेन. त्यामुळे राणे उद्या काय बोलणार याकडे संपूर्ण मराठा बांधवांचे लक्ष्य असेल.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा सरकारच्या अध्यादेशानंतर एक ट्विट केलं होते. राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल होतं, मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या”. आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा”, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला होता.

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या मसुद्यावर १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती घेता येणार आहेत. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी बांधवांना जास्तीत जास्त हरकती घेण्याचं आवाहन केलं आहे. तर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी देखील उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यातच आता नारायण राणे यांच्या ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.