आमदनी आठन्नी खर्चा रुपयाच्या कुटील पक्षातील नेत्यांपासून सावध राहा; मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरातील समृद्धी महामार्ग, मेट्रो आणि एम्स रुग्णालयात आरोग्य सेवांचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी नागपुरातील कार्यक्रमात टेकडीच्या गणपतीला वंदन करून मराठीतुन आपल्या भाषणास सुरुवात केली. “देशाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या समृद्धी महामार्गाच्या निर्मितीमुळे विकासाची गती वाढणार आहे आहे. काही पक्ष स्वार्थी राजकारणात अडकले आहेत. राजकारणातील शॉर्टकटने देशाची प्रगती कधीच होणार नाही. आमदनी आठन्नी खर्चा रुपया अशी कुटील नीती केली जात आहे. अशा नेत्यांपासून देशाला वाचवायचे आहे, असा हल्लाबोल आम आदमी पक्षावर पंतप्रधान मोदींनी केला.

एम्स रुग्णालयात आरोग्य सेवांचे लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, डबल इंजिनच्या सरकारमुळे धरणाच्या कामांना गती मिळाली. राज्याचा खऱ्या अर्थाने आता विकास होईल. अगोदरच्या सरकारमुळे अनेक प्रकल्पाचा खर्च वाढला. गोसीखुर्द प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली नव्हती. मात्री शिंदे-फडणवीसांच्या डबल इंजिनचे सरकार आल्याने या प्रकल्पाला गती मिळालाय. मागील आठ वर्षात आम्ही आमची विचार करण्याची शैली बदलली. महाराष्ट्रातील 11 प्रकल्प भाग्य बदलणारे आहेत. त्याचा राज्याला नक्कीच फायदा होईल.

20 वर्षांपूर्वीच बघितलेलं स्वप्न आज पूर्ण झालं : देवेंद्र फडणवीस

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही वीस वर्षांपूर्वी या समृद्धी महामार्ग उभारण्याचे स्वप्न बघितले होते. ते आज पूर्ण झाले. पंतप्रधान मोदी जर नसते तर आज ते स्वप्न पूर्ण झाले नसते पण त्यांच्या सहकार्याने आज स्वप्न साकार झाले आहे. महामार्गाच्या पूर्णत्वासाठी पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप साथ दिली. ९ महिन्यात ७०० किमी जमीन समृद्धी महामार्गाला मिळाली. मुख्यमंत्री शिंदे यांचे समृद्धी महामार्गाचे काम हे उल्लेखनीय आहे. त्यांच्या अगोदर काहींनी या महामार्गाच्या उभारणीसाठी विरोध केला. मात्र, आम्ही महामार्गाची उभारणी केली.

महाराष्ट्रातील ऐतिहासिक असा समृद्धी महामार्ग : नितीन गडकरी

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, मला खूप आनंद वाटतो कि महाराष्ट्रात अनेक नवे प्रकल्प होत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री काळात या समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी प्रयत्न केले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने महामार्गाचे लोकार्पण होत आहे. महामार्ग बनवताना पाण्याचं संवर्धन करण्यात आले आहे. या महामार्गाच्या उभारणीवेळी 405 तलावाचे खोदकाम करण्यात आले. असा हा ऐतिहासिक असा समृद्धी महामार्ग नव्या स्वरूपात महाराष्ट्राला लाभला आहे.