Corona Virus चा धोका पुन्हा वाढला; पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाभयंकर कोरोना व्हायरसने डोकं वर काढलं असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट झालं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढती कोरोना परिस्थिती आणि आरोग्य सज्जतेचा आढावा घेण्यासाठी संध्याकाळी 4.30 वाजता उच्चस्तरीय बैठक बोलवली आहे.

गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1134 नवीन रुग्ण आढळले आहेत तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दिल्ली, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र आणि केरळमधील रुग्णांचा समावेश आहे. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 7,026 वर पोहोचली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रोजचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचा रेट सध्या 1.09 टक्के आहे आणि आठवड्याचा पॉझिटिव्ह रेट 0.98 टक्के आहे.

कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट XBB1.16 ची सुद्धा तब्बल 76 लोकांना लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये सर्वधिक रुग्ण कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये आढळले आहेत. तसेच दिल्ली, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि तेलंगणा मध्येही XBB1.16 व्हेरिएन्टचे रुग्ण सापडले आहेत.

दरम्यान, लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनावर मात करण्यात देश आत्तापर्यंत यशस्वी ठरला आहे. भारतात आतापर्यंत कोरोना लसीचे 220.64 कोटी पेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. यामध्ये 102.73 कोटींपेक्षा जास्त लोकांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे. तर यातील 95.19 कोटी पेक्षा जास्त लोकांनी दुसरा डोसही घेतला आहे.