सातारा लोकसभेसाठी नरेंद्र पाटलांनीही दंड थोपटले; उदयनराजेंचा पत्ता कट??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभेसाठी (Satara Lok Sabha 2024) महायुतीतील जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. साताऱ्यातून भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी छत्रपती उदयनराजे (Udayanraje Bhosale) इच्छुक आहेत, मात्र भाजपच्या पहिल्या यादीत राजेंचा समावेश नसल्याने त्यांचे कार्यकर्त्ते आक्रमक झाले होते. त्या पार्श्वभूमीवर अमित शाहांना गळ घालण्यासाठी उदयनराजे दिल्ली दरबारी जाऊन बसले आहेत. मात्र राजे दिल्लीत गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे माथाडी नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजप कायकमांड काय भूमिका घेणार ते पाहायला हवं.

नरेंद्र पाटील यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘गेल्यावेळी मी शिवसेनेकडून लढलो होतो. उदयनराजेंविरोधात लढायला कुणीच तयार होत नव्हता. पण मी लढलो आणि चार लाखांच्यावर मते घेतली होती. सातारा लोकसभा मतदार संघात माझी चांगली पकड आहे. भाजपच्या चिन्हावर मला ही संधी मिळावी, अशी इच्छा आहे. खासदार म्हणून मला चांगली काम करण्याची संधी मिळेल. सातारा शहर व गावांमध्ये माझा उत्तम संपर्क आहे. पक्ष मला न्याय देईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे हे मला न्याय देतील अशी आशा आहे.

उदयनराजे हे तीन दिवसांपासून दिल्लीत आहेत. त्यांना अमित शहा यांची भेट मिळत नाही हे ऐकून वाईट वाटतं. आम्ही त्यांना छत्रपती म्हणतो. शिवाय ते राज्यसभेचे खासदार आहेत. तरी देखील त्यांना भेट मिळत नाही. उदयनराजे यांनी सबुरीनं घ्यायला हवं. पक्षाचा निर्णय अंतिम असतो. पक्ष कोणाच्या पारड्यात वजन टाकेल सांगणं अवघड आहे, असं सूचक वक्तव्यही पाटील यांनी केलं. नरेंद्र पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील असल्यामुळे साताऱ्यात भाजप उदयनराजे याना डावलून नरेंद्र पाटलांना तिकीट देत का? आणि असं झाल्यास राजेंची भूमिका काय असेल ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.