Nari Shakti Doot App : पंतप्रधान मोदींनी लाँच केलं नारी शक्ती दूत अ‍ॅप; महिलांना होणार फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Nari Shakti Doot App | जेव्हापासून केंद्रात मोदींचे सरकार आले आहे. तेव्हापासून सामान्य नागरिक, महिला, शेतकरी यांच्यासाठी काही ना काही हिताच्या योजना आणल्या जात आहेत. यापूर्वी मोदींनी गरीब महिलांसाठी उज्वला योजना आणली होती. आता त्यांनी देशभरातील महिला वर्गासाठी नारी शक्ती दूत ऍप लाँच केलं आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी लाँच करण्यात आलेल्या या अँपचा महिलाना नेमका कसा फायदा होणार हे आज आपण जाणून घेऊयात.

काय आहे ‘नारी शक्ती दूत ऍप’? Nari Shakti Doot App

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल सेतूचे उद्धघाटन केले. त्याचबरोबर त्यांनी नारी शक्ती दूत ऍपचे लाँचिंग केले. हे ऍप सर्वसामान्य गरजू महिलांना ओळख देण्यासाठी तसेच त्यांची मदत करण्याच्या हेतूने निर्माण केले आहे. महिलांना सरकारच्या विविध योजनेचा लाभ या ऍपमुळे मिळणार आहे. तसेच सरकारच्या विविध योजनेत महिलांचा समावेश वाढवण्यासाठी या ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. हे अँप वापरण्यास अत्यंत सोपे आणि सुलभ आहे. यामध्ये विविध सरकारी योजनांसाठी अर्ज करण्याची सुविधाही पुरविण्यात येणार आहे. अ‍ॅप आणि वेबपोर्टलसाठी विशेष डॅशबोर्ड तयार करण्यात आला असून महिला थेट अर्ज करू शकतात. सर्व स्तरावरील महिलांचा तसेच नागरिकांचा विचार करून हे ऍप तयार करण्यात आले आहे. त्यामुळे नक्कीच महिलांना याचा चांगला फायदा होणार आहे.

काय होणार महिलांना फायदा?

या ऍपमुळे (Nari Shakti Doot App) सरकारच्या ज्या कोणत्या योजना असतील त्या योजना सामान्य महिलांपर्यंत पोहचवता येणार आहेत. तसेच प्रत्येक योजनेचा सखोल तपशील तसेच त्याची पात्रता यांची माहिती यांमध्ये असणार आहे. गरजू महिलांना याचा अधिक फायदा होणार आहे. यामध्ये महिलांना सवलतीचे कर्ज दर आणि प्रक्रिया शुल्क दिले जाणार आहे. म्हणजेच नारी शक्ती ऍप डाउनलोड केल्यानंतर त्यावरआपले खाते निर्माण केल्यानंतर नारी शक्ती खातेधारकांना सवलतीच्या दरात किरकोळ कर्ज मिळवता येऊ शकणार आहे. आणि माफ केलेल्या प्रक्रिया शुल्काचा फायदाही होऊ शकतो. तसेच दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे विनामूल्य क्रेडिट कार्ड आणि उच्च वापर मर्यादा यासारख्या गोष्टीचा वापर करून महिलांना याचा फायदा होणार आहे.

बँक ऑफ इंडियाने सुरु केले नारी शक्ती बँक खाते

नरेंद्र मोदी यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी नारी शक्ती ऍप लाँच (Nari Shakti Doot App) केले आणि दुसरीकडे बँक ऑफ इंडियाने नारी शक्ती खात्याचे अनावरण केले. हे अनावरण मुंबईतील मुख्य कार्यालयात संचालक मंडळाच्या उपस्थितीत एमडी आणि सीईओ रजनीश कर्नाटक यांच्या हस्ते करण्यात आले. हे खाते निर्माण करण्यात आले कारण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी सुरु करण्यात आले आहे. यामध्ये 18 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांना खाते सुरु करता येते. बँकेचे म्हणणे आहे की हे खाते अनेक फायदे आणि वैशिष्ट्ये ऑफर करते.