NASA Asteroid Alert | पृथ्वीच्या दिशेन येत आहे आस्मानी संकट!! विशाल खडकांमुळे मानवाचा जीवही धोक्यात?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नुकतेच काही दिवसांपूर्वी 50 फुटांपेक्षा लहान आकाराचे अनेक लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेल्याची बातमी आली. या बातमीनंतर सगळेच घाबरले होते. परंतु त्यानंतर आता काही महाकाय अवकाश खडक पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचा खुलासा अमेरिकेची अंतराळ संस्था नासा यांनी केलेला आहे. पृथ्वीच्या दिशेने येत असलेल्या एक लघुग्रह हा 370 फूट मोठा आहे. आणि 7 एप्रिल रोजी तो पृथ्वीच्या सर्वात जवळच्या बिंदूवर पोहोचवण्याची शक्यता देखील वर्तवलेली आहे. (NASA Asteroid Alert)

नासाने या लघुग्रहाला 2024 FH2 असे नाव दिलेले आहे. आता तो पृथ्वीच्या 3.8 दशलक्ष आत जाणार असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. (NASA Asteroid Alert) हे 370 फूट उंचीवर असलेल्या इमारतीपेक्षा मोठे आहे. परंतु हे पृथ्वीवर पडण्याची चिंता अनेकजण करत आहे. परंतु या लघुग्रहाचा पृथ्वीला कोणताही धोका नाही. असे देखील सांगण्यात आलेले आहे. तो पृथ्वीला ओलांडून सौरमालेत परत जाणार असल्याची माहिती देखील आलेली आहे.

अवकाशात दिसणाऱ्या या लघुग्रहांबद्दल नासा वेळोवेळी लोकांना माहिती देत असतात. त्याचप्रमाणे अवकाशाविषयी अधिक ज्ञान पसरवण्याचा नासा प्रयत्न करत असते. तसेच त्याच्या असणारे संभाव्य धोके या सगळ्याची माहिती देखील देत असते.

या लघुग्रहांबद्दल एक अशी आख्यायिका आहे की, सुमारे 65 दशलक्ष वर्षांपूर्वी एक मोठा लघुग्रह हा पृथ्वीवर आढळला होता. आणि त्यामुळे डायनासोर नष्ट झाले होते. त्यावेळी पृथ्वीवर डायनासोरची प्रजात होती. परंतु हा दगड पृथ्वीवर आल्यामुळे त्यांचे नामशेष मिटले. आणि त्यानंतरच लहान प्राण्यांना पृथ्वीवर जीवन जगता आले. मानव हा देखील सस्तन प्राण्यांमध्ये येतो. आज देखील तो असतो पृथ्वीवर राहत आहे. परंतु अशी घटना पुन्हा घडू नये. यासाठी नासा दररोज लघुग्रहांची माहिती घेत असतात. आणि भविष्यात पृथ्वी जवळ येणारे कोणते असे विध्वंसक उपग्रह आहेत. याबद्दल खात्री करून चाचणी देखील करत असतात.