Saturday, February 4, 2023

NASA ला चंद्रावर सापडले पाणी; मनुष्याला राहण्यायोग्य परिस्थिती आहे का?

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नासाच्या (NASA) गॅलिलिओ ऑर्बिटरच्या ताज्या संशोधनातून असे दिसून आले आहे की गुरू (jupiter) या ग्रहाचा चंद्र असलेल्या युरोपाच्या बर्फाळ कवचामध्ये पाण्याचे साठे असू शकतात. युरोपात पृथ्वीच्या महासागरांपेक्षा जास्त पाणी असल्याचा अंदाज अवकाश संस्थेने वर्तवला आहे. प्लॅनेटरी सायन्स जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला असून, त्यातून ही माहिती समोर आली आहे

ज्युपिटर म्हणजेच गुरूला 4 गॅलिलीयन चंद्र आहेत ज्यामध्ये लो, युरोपा, गॅनिमेड आणि कॅलिस्टो यांचा समावेश आहेत. यामधील युरोपा या चंद्राच्या बर्फाळ कवचावर पाणी आहे. शास्त्रज्ञांना (NASA)वाटते की जर युरोपाच्या बर्फाळ कवचावर पाणी अस्तित्वात असेल तर याचा अर्थ असा असू शकतो की हे बाह्य सौर यंत्रणेतील सर्वात प्रवेशयोग्य द्रवपदार्थ असू शकते. हे पृथ्वीच्या पलीकडील जीवनाच्या शोधासाठी एक महत्त्वपूर्ण बिंदू बनवते. अभ्यासात असे दिसून आले आहे की, हे पाणी युरोपाच्या पृष्ठभागाच्या जवळपास 4 ते 8 किलोमीटरवर असू शकते, ज्यामध्ये सामान्यतः सर्वात थंड आणि ठिसूळ बर्फ असतो.

- Advertisement -

NASA europa clipper

दरम्यान, गुरूच्या या चंद्रावर जीवन टिकवण्यासाठी योग्य परिस्थिती आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी NASA २०२४ ला युरोपा क्लिपर मिशन लॉन्च करणार आहे. यासाठी नासाने युरोपा चंद्रच का निवडला याचेही उत्तर नासाने दिले आहे. खरं तर युरोपा वर जीवनासाठी आवश्यक असलेले पाणी, ऊर्जा आणि रसायनशास्त्र असं सर्व काही आहे. असं नासाने म्हंटल. युरोपा क्लिपर हे गुरूभोवती फिरणारे अवकाशयान युरोपाचा अभ्यास करण्यासाठी विज्ञान उपकरणे घेऊन जाईल. यापूर्वी, नासाच्या मोहिमांनी असे सुचवले आहे की युरोपा चंद्राच्या बर्फाळ कवचाखाली खारट महासागर आहे. आता युरोपा राहण्यायोग्य आहे की नाही याचा अभ्यास केला जाईल.