हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपली पृथ्वी निसर्गाने नटलेली आहे. अनेक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. निसर्गात अनेक चमत्कारिक गोष्टी पाहून नागरिकांना नेहमीच आनंदाने कुतुहूल देखील वाटत असते. त्यामुळे पृथ्वीचे अवकाशातून काढलेले असे कितीतरी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु सध्या नासाने एक पृथ्वीचा व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून सगळ्यांनाच धडकी भरलेली दिसत आहे. नासाला भारतासह काही देशांवरील आकाशात असं काही दिसले आहे की, ज्यामुळे अनेकांना भीती वाटू लागलेली आहे.
यावेळी नासाच्या सायंटिफिक विजेलायझेशन स्टुडिओने गोदार्ड अर्थ मॉनिटरी सिस्टीमचा वापर करून एक नकाशा तयार केलेला आहे. हे एक उच्च रिझल्ट हवामान मॉडेल आहे. ते सुपर कम्प्युटरद्वारे तयार केले जाते. या मॉडेलचा वापर वातावरणात नक्की काय बदल घडत आहे? याबद्दल सांगण्यात आलेले आहे. याद्वारे जमिनीवरील निरीक्षण आणि उपग्रह साधनांमधून आपल्याला अनेक डेटा पाहता येतो.
आपल्या पृथ्वीमध्ये खूप सूक्ष्म बदल घडत असतात आणि ते अगदी काही सेकंदात घडतात. या सगळ्या हालचाली तुम्हाला या मॉडेल द्वारे पाहता येतील पृथ्वीवर एका सेकंदात किती वेळा वीज कोसळते? त्याचप्रमाणे वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइडच्या हालचाली या सगळ्याचे निरीक्षण या मॉडेल द्वारे केले जाते.
शास्त्रज्ञांनी काय पाहिले ?
नासाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ब्राऊन रंगाचे ढग फिरताना दिसत आहेत. हे ढग अत्यंत वेगाने पसरत आहे. भारतासह इतर अनेक देशांमध्ये हे ढग फिरताना दिसले. हे ढग म्हणजे कार्बन-ऑक्साइडचा वायू आहे. जो पृथ्वीवर भयानक पद्धतीने पसरताना दिसत आहे.
कार्बन डाय-ऑक्साइड कुठून आला ?
सध्या भारतासह जगभरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण होत आहे. यामध्ये चीन युनायटेड स्टेट्स दक्षिण आशियामध्ये सर्जन पॉवर प्लांट्स त्याचप्रमाणे अनेक औद्योगिक सुविधा आणि कार आणि ट्रक मधून होते
या ठिकाणी उत्सर्जन मोठ्या प्रमाणात आगीमुळे होते. आणि या आगीतून कार्बन-डाय-ऑक्साइड बाहेर पडतो. आणि या कार्बन-डाय-ऑक्साइडमुळेच आपल्याला आकाशात असे ढग तयार झालेले दिसत आहे.