अतिवेगाने प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतासारख्या विकासनशील राष्ट्रात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास, अर्थव्यवस्थेला मिळणारी बळकटी, शिक्षणाबद्दल वाढती जागृतीमुळे मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढताना दिसून येत आहे.  यामुळे शहरे मोठी होत जात आहेत. अश्याच बाबींचा सर्वे करणाऱ्या एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील नाशिक शहर (Nashik City)  देशातील सर्वात जलद वाढणाऱ्या शहरांपैकी एक ठरले आहे.  तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात नाशिकला अधिक संधी असल्याचे सांगण्यात आले आहे.

नाशिक भविष्यात तंत्रज्ञानाचे केंद्र :

नाशिक भविष्यात  तंत्रज्ञानाचे  केंद्र म्हणून उभारी घेताना दिसून येणार आहे. शहरांत 200 पेक्षा अधिक स्टार्टअप उद्योग सुरु आहेत. नवीन येणाऱ्या उद्योगासाठी 30 ते 35 हजार तांत्रिकदृष्टीने सक्षम मनुष्यबल नाशिक शहर आणि आसपास उपलब्ध आहे. आरोग्य व मुक्त विद्यापीठ व अन्य तांत्रिक शैक्षणिक संकुल  नाशिक शहराच्या वाढीसाठी मोलाचे योगदान देत आहेत. भविष्यात सुवर्ण चतुस्कोनाचा ( golden quadrilateral ) चा भाग नाशिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाशिक शहरांची वृद्धी होणार आहे.

IT पार्कमुळे नाशिकच्या विकासाची गती :

नाशिक शहर हे मुंबई व पुणे यांसारख्या महत्वाच्या शहरापासून काहींश्या अंतरावर असल्यामुळे त्याचा फायदा देखील शहराला होणार आहे. समृद्धी महामार्ग नाशिक जिल्ह्यातून जातो तसेच  प्रस्तावित मेट्रो, प्रस्तावित रिंग रोड व प्रस्तावित असलेला आयटी पार्क यामुळे नाशिकच्या विकासाची गती अधिक असेल असे सर्वेक्षणात नमूद केले आहे. याचबरोबर सर्वेक्षणात शैक्षणिक व राहणीमानाच्या बाबतीत शहराला निर्देश्यांक देण्यात आले आहेत.

•शैक्षणिक निर्देशांक – ९.६१ (मध्यम)

•प्रदूषण निर्देशांक – ३७ (चांगला)

•वैद्यकीय परिसंस्था निर्देशांक – २.८८ (मध्यम)

•गुन्हेगारी निर्देशांक – २२.९६ (चांगला)

•राहणीमान निर्देशांक – २२.३६ (चांगला)