Nashik-Pune Highway : राज्यातील दळणवळण सुलभ होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून रस्ते बांधण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले जात आहे. राज्यात समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग सारखे मोठे आणि शाश्वत विकास देणारी कामे हाती घेतली आहेत. त्यातच आता पुणे – नाशिक औद्योगिक महामार्गाला (Nashik-Pune Highway) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. या महामार्गामुळे नाशिक -पुणे आंतर अवघ्या तीन तासात गाठता येणार आहे. सध्या हे आंतर पार करण्यासाठी 5 तासांचा कालावधी लागतो. हा महामार्ग तयार झाल्यानंतर प्रवाशांचा वेळ वाचणार असून येथील उद्योगांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. या महामार्गावरून राजगुरुनगर चाकण मंचर मार्गे थेट शिर्डीला जाता येणार आहे.
उद्योग धंदे आणि विकासाला चालना मिळणार
पुणे ते नाशिक औद्योगिक मार्ग हा लवकरच पूर्णत्वास येणार आहे. पुण्यातील राजगुरुनगर चाकण मंचर मार्गे हा महामार्ग थेट नाशिकला जाणार आहे त्यामुळे पुणे नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या औद्योगिक (Nashik-Pune Highway) विकासाला चालना मिळणार आहे पुण्याच्या आयटी कंपन्या तसेच नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राला या महामार्गाचा मोठा फायदा होणार असून या महामार्गामुळे मुंबई – पुणे -नाशिक ही शहरं द्रुतगती मार्गाने जोडली जाणार आहेत त्यामुळे उद्योग धंदे आणि विकासाला चालना मिळणार आहे.
शिर्डी तीर्थक्षेत्राला जोडला जाणार (Nashik-Pune Highway)
पुणे नाशिक प्रस्तावित महामार्ग (Nashik-Pune Highway) राजगुरुनगर चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर, सिन्नर मार्गे, शिर्डी तीर्थक्षेत्राला जाणार आहे. हा महामार्ग तीन टप्प्यांमध्ये जोडला जाणार असून पहिल्या टप्प्यामध्ये पुणे ते शिर्डी असा 135 किलोमीटरचा मार्ग असणाऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये शिर्डी इंटर चिंच ते नाशिक निफाड इंटरचेंज पर्यंत 60 किलोमीटर असणाऱ्या तर तर तिसरा टप्पा हा सुरत चेन्नई एक्सप्रेस वेला जोडला जाणार आहे महामार्गाचा तिसरा आणि शेवटचा टप्पा हा 60 किलोमीटर असणार आहे नाशिक निफाड इंटरचेंज ते नाशिक असा हा मार्ग असणार आहे.
हा महामार्ग 213 किमीचा असणार आहे. पुणे-नाशिक महामार्गाच्या प्रकल्पासाठी सुमारे 20,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुणे-नाशिक औद्योगिक (Nashik-Pune Highway) महामार्ग हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) महाराष्ट्रातील 4,217 किमी लांबीचे महामार्गाचे जाळे विकसित करण्याच्या योजनेचा एक भाग आहे.