Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्गाला केंद्र सरकारचा हिरवा कंदील ; 8000 कोटींचा निधी मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Nashik-Pune Highway : राज्यातील दळणवळण सुलभ होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून रस्ते बांधण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले जात आहे. राज्यात समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग सारखे मोठे आणि शाश्वत विकास देणारी कामे हाती घेतली आहेत. त्यातच आता पुणे – नाशिक औद्योगिक महामार्गाला (Nashik-Pune Highway) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून आधीच मंजुरी मिळाली आहे. शिवाय याला केंद्राकडूनही निधी मंजूर करण्यात आला आहे.

या महामार्गामुळे नाशिक -पुणे आंतर अवघ्या तीन तासात गाठता येणार आहे. सध्या हे आंतर पार करण्यासाठी 5 तासांचा कालावधी लागतो. हा महामार्ग तयार झाल्यानंतर प्रवाशांचा वेळ वाचणार असून येथील उद्योगांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. या महामार्गावरून राजगुरुनगर चाकण मंचर मार्गे थेट शिर्डीला जाता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जून 2023 मध्ये पुणे ते नाशिक औद्योगिक द्रुतगती मार्गाचा प्रकल्प सादर केला होता. राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाच्या प्रकल्पाला आधीच (Nashik-Pune Highway) मान्यता दिली आहे यानंतर आता केंद्राच्या सत्तेत असलेल्या मोदी सरकारने देखील या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला असून तब्बल आठ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास वरील नाशिक फाटा ते खेड म्हणजेच राजगुरुनगर दरम्यानच्या एका प्रकल्पासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या दोन्ही ठिकाणांना जोडणारा 30 किलोमीटरचा उन्नत मार्ग म्हणजे एलिवेटेड कॉरिडोर उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 7827 कोटी रुपये खर्च (Nashik-Pune Highway) अपेक्षित आहे. मोदी सरकारने या प्रकल्पासाठी वाढीव खर्च लक्षात घेता 8000 कोटींचा निधी मंजूर केला आहे.

कसा असेल मार्ग (Nashik-Pune Highway)

हा मार्ग 213 किलोमीटर लांबीचा असणार असून पुणे ते नाशिक हा प्रवास केवळ तीन तासात पार करता येणार आहे.पुणे नाशिक प्रस्तावित महामार्ग (Nashik-Pune Highway) राजगुरुनगर चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर, सिन्नर मार्गे, शिर्डी तीर्थक्षेत्राला जाणार आहे. हा महामार्ग तीन टप्प्यांमध्ये जोडला जाणार असून पहिल्या टप्प्यामध्ये पुणे ते शिर्डी असा 135 किलोमीटरचा मार्ग असणाऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये शिर्डी इंटर चिंच ते नाशिक निफाड इंटरचेंज पर्यंत 60 किलोमीटर असणाऱ्या तर तर तिसरा टप्पा हा सुरत चेन्नई एक्सप्रेस वेला (Nashik-Pune Highway)जोडला जाणार आहे महामार्गाचा तिसरा आणि शेवटचा टप्पा हा 60 किलोमीटर असणार आहे नाशिक निफाड इंटरचेंज ते नाशिक असा हा मार्ग असणार आहे.

उद्योग धंदे आणि विकासाला चालना मिळणार

पुणे ते नाशिक औद्योगिक मार्ग हा लवकरच पूर्णत्वास येणार आहे. पुण्यातील राजगुरुनगर चाकण मंचर मार्गे हा महामार्ग थेट नाशिकला जाणार आहे त्यामुळे पुणे नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या औद्योगिक (Nashik-Pune Highway) विकासाला चालना मिळणार आहे पुण्याच्या आयटी कंपन्या तसेच नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राला या महामार्गाचा मोठा फायदा होणार असून या महामार्गामुळे मुंबई – पुणे -नाशिक ही शहरं द्रुतगती मार्गाने जोडली जाणार आहेत त्यामुळे उद्योग धंदे आणि विकासाला चालना मिळणार आहे.