Nashik-Pune Highway : राज्यातील दळणवळण सुलभ होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून रस्ते बांधण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले जात आहे. राज्यात समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग सारखे मोठे आणि शाश्वत विकास देणारी कामे हाती घेतली आहेत. त्यातच आता पुणे – नाशिक औद्योगिक महामार्गाला (Nashik-Pune Highway) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. या महामृगामुळे नाशिक -पुणे आंतर अवघ्या दोन तासात गाठता येणार आहे. सध्या हे आंतर पार करण्यासाठी ५ तासांचा कालावधी लागतो. हा महामार्ग तयार झाल्यानंतर प्रवाशांचा वेळ वाचणार असून येथील उद्योगांना याचा मोठा फायदा मिळणार आहे.
हा महामार्ग 213 किमीचा असणार आहे. पुणे-नाशिक महामार्गाच्या प्रकल्पासाठी सुमारे 20,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुणे-नाशिक औद्योगिक (Nashik-Pune Highway) महामार्ग हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) महाराष्ट्रातील 4,217 किमी लांबीचे महामार्गाचे जाळे विकसित करण्याच्या योजनेचा एक भाग आहे.
महामंडळाने जून 2023 मध्ये मोनार्च सर्वेअर अँड इंजीनियरिंग कन्सल्टंट या कंपनीची या महामार्गाचा बृहत आराखडा (Nashik-Pune Highway) तयार करण्यासाठी नियुक्ती केली होती. या कंपनीकडून आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून एम एस आर डी सी ने महामार्गाच्या संरक्षणासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता या प्रस्तावाला अखेर राज्य सरकारने मंजुरी देत हे संरक्षण अंतिम केले आहे. यासंबंधीचा शासन निर्णय गेल्याच आठवड्यात जारी करण्यात आला होता.
या नव्या औद्योगिक कॉरिडोर म्हणून पुणे आणि नगर येथील शेतमालाची वाहतूक समृद्धी मार्गे करता येणं शक्य होणार आहे महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात कर्नाटक तसेच आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू तसेच तेलंगणा या ठिकाणी देखील मालवाहतूक करणे सुरत चेन्नई एक्सप्रेस मुळे सोप्प होणार आहे. तसेच या महामार्गामुळे भविष्य काळामध्ये पुणे अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये बंदर आणि दक्षिणेतील महत्त्वाच्या राज्यांसोबत भक्कम अशी कनेक्टिव्हिटी मिळेल. त्यामुळे याचा फायदा कृषी आणि औद्योगिक (Nashik-Pune Highway) क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहेत
पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग मार्ग (Nashik-Pune Highway)
पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग हा राजगुरुनगर, चाकण, मंचर, शिर्डी या भागातून जाणार आहे. हे तीन भागांमध्ये विभागले जाईल:
- पुणे ते शिर्डी – 135 किमीचे अंतर
- शिर्डी इंटरचेंज ते नाशिक-निफाड इंटरचेंज – ६० किमीचे अंतर ( हा सुरत-चेन्नई एक्सप्रेसवेचा भाग आहे)
- नाशिक-निफाड इंटरचेंज ते नाशिक- ६० किमीचे अंतर ( हा सध्याच्या नाशिक-निफाड राज्य महामार्गाचा भाग आहे आणि त्याला अपग्रेड केले जाईल)