भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिक शहरात विधानसभेला कोण जिंकतंय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक शहर.. २००९ ला मनसेच्या बाजूने कौल देणाऱ्या या शहरात आता भाजपचाच शब्द अंतिम मानला जातो. शहरातील तिन्ही मतदारसंघावर सध्या भाजपचे आमदार आहेत.. मतत्वाचं म्हणजे त्यातल्या दोन महिला आमदार आहेत.. पण महायुती आणि महाविकास आघाडीमुळं अनेक पक्षांची मिसळ होऊन गेलीय.. त्यात लोकसभेला नाशिकनं खासदारकीचा कौल मशालीला म्हणजे महाविकास आघाडीच्या बाजूने दिला असला तरी नाशिक शहरातील दोन विधानसभा मतदारसंघ मात्र महायुतीच्या बाजूने राहिलाय… त्यामुळे भाजपच्या या बालेकिल्लाला आता महाविकास आघाडी सुरुंग लावू शकते का? भाजपच्या या तिन्ही आमदारांना घेरण्याचा विरोधकांचा नेमका काय प्लॅन आहे? करंट स्टेटस मध्ये या तिन्ही जागांवर कोण निवडून येऊ शकतं? त्याचाच हा आढावा…

यातला पहिला मतदारसंघ येतो तो नाशिक मध्यचा…. नाशिक शहराचा खरा चेहरा दाखविणारा, सर्वजाती धर्माचा प्रभाव दिसून येणारा गरीब-श्रीमंत अशी मिश्र लोकवस्ती असणारा, शहराची वाडा संकृती जपणारा, गावठाण भाग सामावून घेणारा आणि तेवढाच पुढारलेला नाशिक मध्य मतदारसंघ…महत्वाची शाळा, महाविद्यालयं. जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा मुख्यालय असा सगळाच महत्वाचा शहरी पट्टा या नाशिक मध्य मतदारसंघात येतो… 2009 मध्ये मतदारसंघ फेररचनेत नाशिक विधानसभा मतदारसंघातून नाशिक मध्यची निर्मिती झाली. इतर तीन मतदारसंघात नाशिक विधानसभा मतदारसंघ विभागाला गेला परंतु गाभा ‘नाशिक मध्य’ मध्येच राहिला… देवयानी फरांदे या मागील दोन टर्म या मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून येतायत.. फरांदेंना विरोधकांचा नसेल इतका धोका पक्षांतर्गत आहे, असं बोललं जातं.. कारण २०१४ लाही तिकीटाच्या रस्सिखेचात गुजरातमधून सूत्र हालवत माजी महापौर राहीलेल्य देवयानी फरांदे यांनी गुजरातमधून सूत्र हालवून तिकीट मिळवल्याचं सांगितलं जातं.. २०१४ ला त्या भाजपकडून आमदार झाल्याच पण विशेष म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर मनसे तर तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना पक्ष फेकला गेला होता…

YouTube video player

२०१९ ला मात्र देवयानी फरांदे यांनी काँग्रेसच्या हेमलता पाटील यांच्या विरोधात मोठं लीड घेत दणदणीत विजय मिळवला होता.. पण काँग्रेसचा हा जुना बालेकिल्ला असल्यामुळे काँग्रेसला इथं हक्काची वोटबँक नेहमीच मिळत आलीय… २००९ साली मनसेच्या लाटेवर स्वार होत या मतदारसंघातून वसंत गीते हे आमदार झाले होते.. मात्र यानंतर मनसेला या मतदारसंघात फारसा जम बसवता आलेला नाहीये.. पण सध्या भाजपचा हा मतदारसंघ सध्या डेंजर झोनमध्ये गेलाय.. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत याच नाशिक मध्यमधून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लीड मिळाल्यामुळे देवयानी फरांदे यांची आमदारकी धोक्यात आली आहे.. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून माजी आमदार वसंत गीते हे तगडी फाईट देऊ शकतात.. दोघांच्यात असणारं कडवं वैर पाहता फरांदे चार महिने आधीच प्रचाराच्या धामधूमीला लागल्याचं मतदारसंघात पाहायला मिळतंय.. काँग्रेस शहराध्यक्ष राकेश छाजेड आणि हेमलता पाटील यांचीही नावं इच्छुकांच्या यादीत आहेत.. पण महाविकास आघाडी म्हणून विचार करायचा झाला तर गीते हे कधीही उजवे ठरतील..

दुसरा मतदारसंघ नाशिक पूर्व…. पंचवटी, नाशिकरोड आणि आजूबाजूची खेडी असा शहरी ग्रामीण टच असणारा हा मतदारसंघ. इंडियन सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस सोबतच कामगार वस्तीलाही नाशिक पूर्व सामावून घेतो.. म्हणूनच हा मतदारसंघ राजकारणासाठी चांगलाच जड जातो… २००९ ला तयार झालेल्या या मतदारसंघावर मात्र आमदारकीचा पहिला झेंडा फडकवला तो मनसेनं.. बदलत्या वाऱ्याची दिशा ओळखणारे आणि सहकार क्षेत्राची जाणं असणारे स्वर्गीय उत्तमराव ढिकले यांनी मनसेच्या तिकिटावर नाशिक पूर्वचे पहिले आमदार होण्याचा मान मिळवला… २०१४ मध्ये मोदी लाट उसळल्याने उत्तमराव ढिकले निवडणुकीपासून दूर राहिले. उमेदवाराच्या भाऊगर्दीत भाजपचे बाळासाहेब सानप निवडून आले… यानंतर हा मतदारसंघ भाजपचा झाला… यानंतर नाशिकच्या भाजपात ‘सबकुछ सानप’ असा प्रकार बघायला मिळाला.. सानपांनी शहरातील भाजपवर कंट्रोल ठेवला.. पण निष्ठावंतांना डावलणं, मनमानी कारभार करणं, स्थानिक स्वराज संस्थांमधील पराभव यामुळे सानपांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी चांगलीच वाढली… तर दुसरीकडे माजी आमदार उत्तम ढिकले यांचे चिरंजीव राहुल ढिकले यांचा जनसंपर्क आणि विधानसभेसाठी त्यांनी लावलेली तगडी फिल्डींग पाहता भाजपने बाळासाहेब सानपांना डच्चू देत राहुल ढिकलेंना उमेदवारी देत सेफ गेम खेळला… त्यामुळे नाराज सानपांनी एनवेळी राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधत निवडणूक लढवली.. पण भाजपनं या निवडणुकीत सानपांना चारी मुंड्या चित केलं.. आणि राहुल ढिकले दणक्यात नाशिक पूर्वमधून निवडून आले.. पण निकालाला काही दिवस झाले नाही तोच बाळासाहेब सानपांनी हातातलं घड्याळ उतरवत शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलं.. हे कमी होतं की काय म्हणून पुन्हा सानप यु टर्न मारत आपल्या मुळ जाग्यावर म्हणजे भाजपात गेले… थोडक्यात सानपांनी आपली क्रेडीबिलीटी स्वत:च्या हाताने कमी करुन घेतली.. त्यामुळे यंदा पुन्हा राहुल ढिकलेच भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात दिसतील, हे कन्फर्म आहे… अतिशय सिस्टिमॅटीक निवडणुक लढवण्यासाठी ढिकले ओळखले जातात.. त्यात लोकसभेला त्यांनी युतीच्या उमेदवाराच्या पाठिशी मोठं लीड दिल्यामुळे ढिकले सेफ झोनमध्ये आहेत.. पण त्यांना टक्कर देण्यासाठी शरद पवार गट आणि ठाकरे गट दोघेही उत्सुक असल्याचं सध्या पाहायला मिळतंय.. जगदीश गोडसे, तरुण उद्योजक अतुल मते सध्या या स्पर्धेत सर्वात जास्त आघाडीवर आहेत.. पण भाजपला टक्कर देण्यासाठी या मतदारसंघात महाविकास आघाडीला एक्स्ट्रा एफर्ट घ्यावे लागतील, एवढं मात्र नक्की…

यातला तिसरा आणि शेवटचा मतदारसंघ येतो तो नाशिक पश्चिमचा…. कामगार वर्गाची वस्ती म्हणून नाशिक पश्चिमची सर्वात महत्वाची ओळख. खानदेशबहुल पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात मोठ्य प्रमाणावर परप्रांतीयांचंही विस्थापन झालंय… अंबड व सातापूर एमआयडीसीचा हा सगळा कामगार लोंढा याच मतदारसंघात येत असल्याने इथले नागरी प्रश्नही बरेच गुंतागुंतीचे असतात.. इथलं राजकारणही मुळात याच प्रश्नांच्या अवतीभोवती फिरताना दिसतं.. २००९ ला जेव्हा हा मतदारसंघ तयार झाला तेव्हा शिवसेनेच्या लाटेत नाशिक पश्चिममधून मनसेचे नितीन भोसले आमदार झाले.. पण २०१४ मध्ये भाजपच्या लाटेत मनसेचं शहरातील राजकारण वाहून गेलं आणि भाजप नगरसेविका सीमा हिरे मनपाच्या सभागृहातून थेट विधिमंडळात जाऊन धडकल्या… तर २०१९ ला इथं पहिल्यांदाच हिरे विरुद्ध हिरे असा संघर्ष पाहायला मिळाला.. युतीने भाजपचे स्टँडिंग आमदार सीमा हिरे यांनाच तिकीट रिपिट केलं.. तर तर राष्ट्रवादीकडून अपूर्व हिरे यांनी अपयशी फाईट दिली… आणि पुन्हा एकदा भाजपच्या सीमा हिरे यांनी आमदारकीचा गुलाल उधळला… नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदासंघात युतीच्या उमेदवारालाच या मतदारसंघातून लीड मिळालं असलं तरी २०१९ चा विचार करता ते कमालीचं घटल्यानं ही सीमा हिरे यांच्यासाठी धोक्याची घंटी ठरु शकते… त्यात यंदा महायुतीतील इच्छुकांची संख्या झपाट्यानं वाढत चालल्यानं ही हीरेंसाठी डोकेदुखी ठरु शकते.. कसभा निवडणुकीत उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेले माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली तर सीमा हिरे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.. तर दुसरीकडे मविआकडून ठाकरे गट या जागेवर हक्क सांगण्याची अधिक शक्यता आहे. जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याने राऊतांकडून त्यांच्या नावाचा हट्ट नाशिक मध्यसाठी धरला जाऊ शकतो… पण महायुतीसाठी सध्या ही जागा सेफ झोन मध्ये असली तरी दगाफटका झालाच तर ही हातची जागा सुद्धा जाऊ शकते.. बाकी महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर इथली लढत निसटती होणार की चुरशीची हे ठरणार आहे… एवढं मात्र नक्की