Union Budget 2023 : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर; ‘या’ दिवशी सादर होणार बजेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे होय. मात्र, अर्थसंकल्प कधी मांडला जाणार? त्यामध्ये नेमक्या काय तरतुदी केल्या जाणार त्यातून सर्वसामान्य लोकांना काय दिले जाणार? याची चर्चा सध्या होऊ लागली असताना केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा करण्यात आली आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.

नुकतीच केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत घोषणा करण्यात आली असून 31 जानेवारीपासून सुरू होत असलेले अधिवेशन 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. नेहमीच्या सुट्टीसह 66 दिवसांमध्ये 27 बैठका होणार आहेत. ही सुट्टी 14 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यंत अवकाश घेतला जाणार आहे. 12 मार्चपासून अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे.

1 फेब्रुवारी 2023 ला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. हा अर्थसंकल्प सादर करत असताना सरकारचे लोकसभा निवडणुकीवर विशेष लक्ष असणार आहे. दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला. तवांगच्या मुद्द्यावरून 17 विरोधी पक्षांनी राज्यसभेतून सभात्याग केला.

विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील वादग्रस्त वक्तव्यावरून संसदेत चांगलाच गदारोळ झाला. यावेळेस होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नक्की सर्वसामान्यांच्या हिताच्या दृष्टीने काय निर्णय घेतले जाणार? हे पहावे लागणार आहे.