‘गोली का जवाब गोली से’ जवानांना बीजेपीची साथ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था जयपूर (राजस्थान) | बीजेपी चे अध्यक्ष अमित शहा यांनी १८ फेब्रुवारीला राजस्थान येथील जयपूर येथे भेट दिली. यावेळी ‘शक्ती केंद्र संमेलनात’ बोलताना त्यांनी सांगितले की, बीजेपी ने जवानांसाठी पूरक असे उपक्रम राबविले आहेत.नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी आल्यावर भारतीय सेनेला मजबूत करणे, त्यांना अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे त्याच बरोबर त्यांना योग्य ते अधिकार देणे या सर्व गोष्टींसाठी चांगली सुरवात केली आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा सर्वात चांगले ‘रक्षा बजेट’ बीजेपी घेऊन आली आहे. याचा फायदा आपल्या देशाला नक्की होईल.

आतंकवाद्यांना प्रत्त्युत्तर देण्यास मजबूत नीती अवलंबिण्यासाठी बीजेपीने सुरवात केली आहे. यासाठी देशी-विदेशी अशा सर्व तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. भारतीय सेनेला असे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाईल. तसेच  ‘गोली का जवाब गोली से’ अशी वेळ आल्यावर भारतीय सेनेला बीजेपी सरकारने पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. जवानांची हिम्मत वाढवण्यासाठी बीजेपी त्यांना सातत मदत करत आहे.

जयपूर येथे ‘मेरा बूथ मेरा अभिमान’ मोहिमेच्या कार्यकर्त्यांना संबोधीत केले.तसेच राज्यसभेच्या मुख्यालयात राज्यसभेचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष यांच्याशी त्यांनी बैठक केली.

इतर महत्वाचे

झारखंड च्या सुधारणेसाठी केंद्र सरकारने उचलली ही पावले …

राज ठाकरेंनी आमच्यासोबत यावं – अजित पवार

…तर भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी राष्ट्रपती वाट्टेल तेवढा वेळ देतील ! – डॉ. कुमार सप्तर्षी

माढातून लोकसभा लढवण्याबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

Leave a Comment