चिंताजनक! देशात कोरोना रुग्णांचा आकडा २५ लाखांच्यावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग देशात अद्यापही झपाट्याने वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांमध्ये ६५ हजार २ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २५ लाख २६ हजार १९३ झाली आहे. एकूण मृत्यूचा आकडा ४९ हजार ३६ वर पोहोचला आहे. मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१७ टक्क्यांवर आले असून मृत्यूदर १.९५ टक्क्यांवर आला आहे.

देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ५५ हजार ५७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १७ लाख ५१ हजार ५५५ झाली आहे. ६ लाख ६१ हजार ५९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर गेल्या २४ तासांमध्ये ८ लाख ६८ हजार ६७९ इतक्या विक्रमी नमुना चाचण्या केल्या गेल्या. एकूण २.८५ कोटी चाचण्या झाल्या आहेत.

१० लाख लोकसंख्येमागे प्रतिदिन सरासरी ६०३ चाचण्या घेतल्या जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार हे प्रमाण १४० चाचण्या इतके असणे गरजेचे आहे. ३४ राज्यांमध्ये प्रतिदिन राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त चाचण्या होत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment