केरळमध्ये मशिदीत पार पडला हिंदू विवाह सोहळा; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । भारत हा धर्मनिरपेक्षता मानणारा देश असून या ठिकाणी आपल्या धर्माच्या अभिमानसोबतच इतर धर्मियांनाही योग्य सन्मान देण्याची शिकवण दिली जाते. इथे बहुसंख्य आणि अल्पसंख्य आधारावर कोणताच भेदभाव होणार नाही हे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वामध्येच लिहलेलं असताना याचंच प्रात्यक्षिक केरळमध्ये पाहायला मिळालं आहे.

केरळच्या अलपुझा जिल्ह्यामधील कायमकुलम येथील मुस्लीम समाजाने हिंदू तरुणीचं लग्न लावून देत एकतेचा संदेश दिला. इतकंच नाही तर हे लग्न १०० वर्ष जुन्या चेरावल्ली जमात मशिदीत लावण्यात आलं. अगदी हिंदू धर्माच्या पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. हे लग्न सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या लग्न सोहळ्याची दखल खुद्द मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी घेतली असून त्यांनी नवदाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

विवाह झालेल्या तरुणीचं नाव अंजू आहे. अंजूच्या वडिलांचा दोन वर्षापूर्वी ह्रदयविकाराने मृत्यू झाला होता. आई बिंदू यांच्यासमोर मुलीचं लग्न कसं करायचं याची चिंता लागली होती. पतीच्या निधनानंतर असहाय्य झालेल्या बिंदू आपल्या तीन मुलांसोबत भाड्याच्या घरात राहतात. त्यांनी मशिदीच्या व्यवस्थानकडे यासाठी मदत मागितली. यावर त्यांनी तात्काळ मदतीसाठी तयारी दर्शवली.

लग्नासाठी १९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजून १० मिनिटांचा मुहूर्त काढण्यात आला. मशिदीच्या वतीने पत्रिका छापून वाटण्यात आल्या. विशेष म्हणजे मशिदीकडून पाहुण्यांच्या जेवण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. यासोबत नवदांपत्याला दहा तोळे सोने आणि दोन लाख रुपये भेट म्हणून देण्यात आले.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

वर्गशिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्यासोबत काढला घरातून पळ; पोलिसांत तक्रार दाखल

तुमचे आधारकार्ड हरवलंय? काळजी करू नका; 15 दिवसात घरपोच मिळेल, जाणून घ्या प्रक्रिया

Amazon घेऊन येत आहे पर्यावरणपूरक ई रिक्षा; संस्थापक जेफ बेझोस यांनी ट्विटरवरून दिली माहिती

Leave a Comment