सगळ्या सणांची नावे घेतली पण… – असद्दुदीन ओवेसी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सायंकाळी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक २ ची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी देशातील नागरिकांशी संवाद साधला आहे. या भाषणात मोदींनी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजना ते गरीबांना मोफत अन्नधान्य देण्याच्या सर्व योजनांबद्दल मोदींनी माहिती दिली. मोदींच्या भाषणानंतर आता विरोधी पक्ष नेते सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत. MIM पक्षाचे खासदार असद्दुदीन ओवेसी यांनीही मोदींच्या भाषणावर टीका केली आहे. येणाऱ्या महिन्यामधल्या सगळ्या सणांची यादी घेतली पण बकरी ईद विसरले असे म्हंटले आहे.

आपल्या ट्विटर अकॉउंटवरून असद्दुदीन ओवेसी यांनी मोदींच्या भाषणावर टीका केली आहे. “मोदींना बोलायचे होते चीनवर पण बोलले चण्यावर. तेही गरजेचे होते कारण त्यांच्या अनियोजित संचारबंदीमुळे अनेकांना आपल्या अन्नाला मुकावे लागले आहे. आणखी एक लक्षात आली ती अशी की, त्यांनी येणाऱ्या महिन्यांमध्ये होणाऱ्या सर्व सणांची नावे घेतली मात्र बकरी ईद चे नाव घ्यायला विसरले.” असे ट्विट त्यांनी केले आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेर पोस्ट करत मोदींना टोला लगावला आहे.

 

मोदींनी मंगळवारी केलेल्या भाषणात चीनचा उल्लेख टाळल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. केंद्र सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी App बंद केल्यानंतर मोदी सरकारची भूमिका मांडतील अशी अनेकांना अपेक्षा होती, परंतू मोदींनी आपल्या भाषणात चीनचा उल्लेख टाळला. दरम्यान आपल्या भाषणात नरेंद्र मोदींनी, अनलॉक १ पासून लोकांमध्ये निष्काळजीपणा वाढला असून, सार्वजनिक ठिकाणी नियमांचं पालन होताना दिसत नसल्याची खंत व्यक्त केली. गावचा सरपंच असो किंवा देशाचा पंतप्रधान, नियमांच्या पुढे कोणीही मोठं नाही, अशा शब्दांमध्ये मोदींनी नियम मोडणाऱ्यांना सुनावलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment