कोरोना लसीसंदर्भात पंतप्रधान मोदींचं मोठं विधान ; म्हणाले की….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना प्रधुर्भाव कमी झाला नसून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. तसेच कोरोना वर लस शोधण्याचे प्रयत्न सुरूच असून लसिंच्या चाचण्या सुरू आहेत. लवकरच कोरोनावर यशस्वी लस येईल असे भाकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. तसेच जेव्हा लस येईल तेव्हा ती देशातील सर्व नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे , कोणालाही वगळण्यात येणार नाही असेही मोदींनी स्पष्ट केले.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानांनी कोरोना लसीवर भाष्य केलं आहे. लसीच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात लस उपलब्ध होताच सर्वांना ही लस दिली जाईल. कोणालाही वगळण्यात येणार नाही अशी खात्री मी देशाला देतो. भारत सरकारने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामुळे आणि लोकांच्या मदतीने बऱ्याच जणांचे जीव वाचले, लॉकडाऊन लागू करण्याचा आणि त्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्याचा कालावधी पूर्णपणे योग्य होता असं मोदी म्हणाले.

कोरोना अजूनही गेला नसून सध्याच्या परिस्थितीत लोकांनी सावध राहिले पाहिजे. सणांच्या दिवसात लोकांनी अधिक जागरूक असले पाहिजे, कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करून चालणार नाही. लस वितरणाची तयारी सध्या भारत सरकारकडून केली जात आहे, जेणेकरून वेळ येताच संपूर्ण देशामध्ये ही लस उपलब्ध होऊ शकेल. एका अंदाजानुसार सर्व देशवासीयांना लस देण्यासाठी सरकारने सुरुवातीला ५० हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. एका व्यक्तीला लस देण्यासाठी ३८५ रुपयांपर्यंत खर्च होईल असंही सांगण्यात आलं.

नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात घोषणा केली होती की, सत्तेत आल्यानंतर भाजपा बिहारमधील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस देणार आहे. यावरून नवीन वाद निर्माण झाला.  विरोधकांनी भाजपाच्या या घोषणेवर निशाणा साधला. निवडणुकीच्या फायद्यासाठी कोरोनाचा वापर केला जात आहे असा आरोप भाजपावर करण्यात आला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment