राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर; नेमबाज राही सरनोबत आणि क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना अर्जुन पुरस्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. नेमबाज राही सरनोबत आणि क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना अर्जुन पुरस्कार तर रुस्तम-ए-हिंद दादू दत्तात्रय चौगुले यांना ध्यानचंद पुरस्कार जाहीर झाला आहे.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०१८ ची घोषणा करण्यात आली. मानाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारोत्तोलक एस.मीराबाई चानू आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांची निवड करण्यात आली आहे. एकूण ६ श्रेणींमध्ये ३५ खेळाडू व प्रशिक्षक आणि ३ संस्थाना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते मंगळवार दिनांक २५ सप्टेंबर २०१८ रोजी राष्ट्रपती भवनात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे..

Leave a Comment