मित्र चालले सोडून, NDA ची अवस्था बिकट; ,फक्त आठवलेच राहिले सोबतीला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाने भाजपलाही फटका बसला आहे. आधी जुने सहकारी राजकिय मतभेदामुळे दूर झाल्याने आणि त्यातच रामविलास पासवान यांच्या निधनामुळे केंद्रातील 51 मंत्र्यामध्ये फक्त रामदास आठवले हेच एकमेव बिगर भाजप मंत्री असून बाकी सर्व मंत्री हे भाजपचेच आहेत.

देशात १९७७ साली पहिले आघाडी सरकार स्थापन झाले. तेव्हापासून अशी वेळ पहिल्यांदाच आली आहे. आठवले केंद्रीय सामाजिक कल्याण राज्यमंत्री आहेत. रालोआ २०१९ साली पुन्हा सत्तेत आल्यानंतर आपल्या घटक पक्षांना काही मंत्रीपदे देऊ केली होती. त्यामध्ये शिवसेनेच्या अरविंद सावंत यांना अवजड उद्योग, अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांना अन्नप्रक्रिया खात्याचे व रामविलास पासवान यांना ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण खात्याचे मंत्री केले होते.

परंतु गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये भाजपची साथ सोडून शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडीचे सरकार स्थापन केले. केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी पदाचा राजीनामा दिला. गेल्या महिन्यात कृषी विधेयकांवरून मतभेद झाल्याने हरसिमरत कौर यांनीही मंत्रिपद सोडले. आणि त्यातच आता प्रदीर्घ आजारामुळे रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे.त्यामुळे रालोआ साठी हा खूप मोठा धक्का आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment