अखेर चिदंबरम यांची होणार तिहारमधून सुटका

आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर दिलासा मिळाला आहे. याप्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयानं चिदंबरम यांना २ लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. त्यामुळे चिदंबरम यांचा तिहार तुरूंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नौदलाची ताकद आणखी वाढणार; २०२० पर्यंत ३ युद्धनौका दाखल होणार

येत्या काळामध्ये नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे. ”२०२० पर्यंत नौदलाच्या ताफ्यामध्ये आणखी ३ स्वदेशी युद्धनौका दाखल होणार असून, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हि बाब महत्वपूर्ण ठरणार आहे.

MTNL, BSNL ची स्वेच्छानिवृत्ती योजना बंद; स्वेच्छानिवृत्तीसाठी तब्बल ९२ हजार अर्ज

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. त्याचवेळी या दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजनेची घोषणाही करण्यात आली होती.

भाजपा सरकार रेल्वे सुद्धा विकेल; ‘कॅग’च्या रेल्वे अहवालावरून प्रियंका गांधीची टीका  

रेल्वेच्या कामगिरीबाबत कॅगने दिलेल्या अहवालावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसची मदत घेत होते; सुमित्रा महाजन यांचा भाजपला घरचा आहेर

मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार कार्यरत असताना राज्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे आणि विकासाचे विषय मी उपस्थित करू शकत नव्हते. त्यावेळी मला मौन बाळगावे लागले. कारण, राज्यात माझ्याच पक्षाची अर्थात भाजपची सत्ता होती, अशी खळबळजनक खुलासा खुद्द माजी लोकसभाध्यक्ष आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांनी केला आहे. रविवारी रात्री एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच महत्त्वाचे, विकासाचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी कधीकधी मला काँग्रेसच्या नेत्यांचीच मदत घ्यावी लागत होती, अशीही खंत त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

नक्षलवादी म्हणून पोलिसांनी घातल्या १७ ग्रामस्थांना गोळ्या, न्यायालयाच्या अहवालातून मिळाली माहिती

नक्षलवादी म्हणून पोलिसांनी घातल्या १७ ग्रामस्थांना गोळ्या, न्यायालयाच्या अहवालातून मिळाली माहिती छत्तीसगड पोलिसांनी २०१२ मध्ये बिजापूर जिल्ह्यातील सरकेगुडा येथे केलेल्या बनावट चकमकीत १७ ग्रामस्थांना गोळ्या घालून ठार केले होते, अशी धक्कादायक माहिती न्यायालयीन चौकशीतून उघड झाली आहे. या प्रकरणी सात वर्षे सुनावणी झाली आणि त्यानंतर न्यायमूर्ती विजय कुमार अग्रवाल यांनी याबाबतचा चौकशी अहवाल मागील महिन्यात सादर केला. मात्र, रविवारी हा अहवाल लीक झाला. त्यातून ही माहिती उघड झाली आहे.

भारतीय खगोलशास्त्रज्ञानेच ‘विक्रम लँडर’चा पत्ता शोधला

अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं चांद्रयान-२ मोहिमेबद्दल मोठी माहिती दिली आहे. विक्रम लँडरचे तुकडे सापडल्याचा दावा नासाकडून करण्यात आला आहे. नासाच्या लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरनं विक्रम लँडरचा फोटो टिपला आहे. विशेष म्हणजे नासाने हा दावा केला असून तो एका भारतीय इंजिनिरने दिलेल्या माहितीतूनच समोर आलं आहे. चेन्नई येथील ट्विटवर शान नाव असलेल्या षण्मुगा सुब्रमण्यम या युवा इंजिनिअरनेच विक्रम लँडरशी सर्वात प्रथम संपर्क साधला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रवासाचे भाडे सरकारने थकवले !

देश विदेशामध्ये प्रवास करण्यासाठी नेत्यांना ‘एअर इंडिया’ तर्फे सेवा पुरवली जाते. मात्र कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन या दोन सरकारी कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत विकण्यात येणार आहेत अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. मात्र आता सरकारने अती महत्वाच्या व्यक्ती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, परदेशी पाहुणे, पंतप्रधान यांच्या प्रवासाचा खर्च एअर इंडियाला दिलेला नसल्याची धक्कदायक माहिती समोर आलेली आहे.

सरकारने नरेंद्र मोदींच्या प्रवासाचे ४५८ कोटी रुपये थकवले !

सरकारने अती महत्वाच्या व्यक्ती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, परदेशी पाहुणे, पंतप्रधान यांच्या प्रवासाचा खर्च एअर इंडियाला दिलच नसल्याची धक्कदायक माहिती समोर आलेली आहे.

राज्यात फिल्मसिटीसाठी मुख्यमंत्र्यांचे बच्चनला साकडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची अमिताभ बच्चन यांसोबत काल रविवारी भेट झाली. साधारण पाऊण तास झालेल्या भेटीत, आमचं सरकार राज्यात फिल्म सिटी उभी करण्याविषयीच्या सर्व प्रस्तावांवर विचार करत असल्याचं मुख्यमंत्र्यानी सांगितलं. अमिताभ बच्चन आपल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटासाठी आलीय भट्ट, रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या सोबत सध्या मनालीमध्ये आहेत. … Read more