राज ठाकरे यांची आण्णा हजारेंसोबत बंद खोलीत चर्चा, पहा काय झाली बातचीत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि जल संरक्षक राजेंद्र सिंह यांनी आण्णा हजारे यांची सोमवारी राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. यावेळी ठाकरे आणि हजारे यांच्यात बंद खोलीत अर्धा तास चर्चा झाली. यानंतर राज यांनी पत्रकार परिषद घेऊन आण्णांच्या उपोषणाला आपला पाठींबा असल्याचे जाहीर केले.

अण्णा हजारे लोकायुक्तांच्या नेमणुकीसाठी आमरण उपोषणाला बसले असून आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. यापार्श्वभुमीवर ठाकरे यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांना आपले पूर्ण समर्थन दर्शविले. मनसे नेते आणि हजारे यांची यादवबाबा मंदिरात २० मिनिटे बंद खोलीत बैठक झाली. बैठकी नंतर ठाकरे यांनी नरेंन्द्र मोदी यांच्या निषेधार्थ घोषणा केल्या.

“२०१३ रोजी मोदींनी लोकपाल विधेयकाच्या बाजूने ट्विट केले होते. आता मोदी सरकारचे सुमारे पाच वर्ष पूर्ण झाले आहेत. परंतु अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. आज अाण्णांच्या २०१३ च्या आंदोलनामुळचे सत्ताधारी सत्तेत आहेत. हे त्यांनी विसरू नये.” असे मत राज यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले.

तसेच, “नालायकांसाठी जीवाची बाजी लाऊ नका, ढोंगी लोकांसाठी आपल्या प्राणांची आहुती देऊ नका” असा सल्ला राज यांनी आण्णांना दिला. ‘दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी आण्णांसाठी इथे यायला हवं होतं’ असं म्हणत राज यांनी केंद्र सरकार बरोबर केजरिवाल यांच्यावरही टीका केली.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

 

इतर महत्वाचे –

अण्णा हजारेंचा सरकारला अल्टीमेटम! जनतेला दिलेली आश्वासनं पुर्ण करा, अन्यथा..

आणि राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा ढाब्यावर थांबला…

सेक्स करताना महिला जास्त उत्तेजित होतात, जाणुन घ्या काय आहेत कारणे

Leave a Comment