सिमांचल एक्सस्प्रेस रुळावरून घसरल्याने ६ ठार, १० गंभीर.

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बिहार |

बिहार येथे आज सकाळी सिमांचाल एक्सप्रेस या दिल्लीवरुन आलेल्या रेल्वेगाडीचे ९ डब्बे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत ६ जण मृत्युमुखी तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाला तेव्हा गाडी तिच्या सर्वाधिक वेगात असल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टरांचं एक पथक तातडीने या ठिकाणी पाठवलं गेलं असून रेल्वे प्रशासन ही तातडीने मदतीसाठी दाखल झालं आहे. दरम्यान रेल्वे अपघातांच्या वाढत्या प्रमाणामुळे सुरेश प्रभूंनी मागे रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. विद्यमान रेल्वेमंत्री या दुर्घटनेकडे कसं पाहतात हे पाहणं लक्षणीय ठरणार आहे.

दरम्यान रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून, रेल्वे प्रशासन जबाबदारीने आणि तातडीने मदतीचे काम करत आहे.राष्ट्रीय आपत्ती निवारण दलातर्फे(एनडीआरएफ) मदतीचे काम हाती घेण्यात आले आहे. असे म्हटले आहे.

Leave a Comment