भाजपाची हार हे तर भारतात लोकशाही मजबुत असल्याचं उदाहरण – सुमित्रा महाजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या तीन मोठ्या राज्यांतील विधानसभा निवडणुकांमधे भाजपा ला मोठा धक्का बसला आहे. तीनही राज्यात काँग्रेस आघाडीवर असून लोकांनी भाजप ला नाकारलं असल्याचं स्पष्ट होत आहे. यापार्श्वभूमीवर ‘भाजपाची हार हे तर भारतात लोकशाही मजबुत असल्याचं उदाहरण आहे’ असं मत लोकसभा स्पिकर सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केलं आहे. लोकसभेच्या आवारात पत्रकारांनी त्यांना विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रश्न विचारला असता त्या बोलत होत्या.

‘लोकशाहीत हे तर व्हायलाच हवं. कधी कोणाचं सरकार तर कधी कोणाचं सरकार येतंच असतं. पण यात जनता सुद्धा आपलं मत मांडते हे लोकशाहीचं बलस्थान आहे. जनतेला जे काही वाटतं ते जनता आपल्या मतदानातून दाखवून देते. लोकसभेत कितीही हंगामा करा मात्र पाच वर्षांनंतर जनता बोलते आणि ते लोकप्रतिनिधींना एकावंच लागतं’ असं महाजन म्हणाल्या.

मध्यप्रदेश मधे काँग्रेस १०९ तर भाजप ११० जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. छत्तीसगड मधे काँग्रेस ६३ तर भाजपा २१ आणि राजस्थाम मधे काँग्रेस ९९ तर भाजपा ७६ जागांवर आघाडीवर आहे.

इतर महत्वाचे –

दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?

माजी गृहमंत्र्यांना नडणारे हे DYSP नक्की आहेत तरी कोण?

भाजपा कार्यकर्ते आणि पोलीसांत धुमश्चक्री, पोलीस अधिक्षक जखमी

भाजपाची हार हे तर भारतात लोकशाही मजबुत असल्याचं उदाहरण - सुमित्रा महाजन

Leave a Comment