देशभरात रेल्वेचे जाळे आणखी मजबूत करण्यात येत आहे. अशातच आता देशातील मुख्य शहरांना रेल्वे द्वारे जोडण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून लवकरच भारताचे नंदनवन कश्मीर आणि राजधानी दिल्ली या मार्गावर थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार आहे. चला जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती.
खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारीमध्ये उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) वर काश्मीर ते नवी दिल्ली जोडणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करतील, असे रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी मंगळवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारीमध्ये उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) वर काश्मीर ते नवी दिल्ली जोडणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करतील, असे रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी मंगळवारी सांगितले.
रेल्वेने 272 किमी यूएसबीआरएल प्रकल्पापैकी 255 किमी पूर्ण केले आहे, कटरा आणि रियासी दरम्यान फक्त 17 किमीचा छोटासा भाग डिसेंबरपर्यंत पूर्ण केला जाईल. रवनीत सिंह म्हणाले की, पंतप्रधानांच्या वेळापत्रकानुसार उद्घाटन जानेवारीत होईल. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा प्रकल्प यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
तपासले जात आहेत सर्व पैलू
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रत्येक पैलू तपासणे आवश्यक आहे आणि या सर्व गोष्टींची मोठ्या प्रमाणावर तपासणी केली जात आहे आणि सर्व काही प्रमाणानुसार आहे याची खात्री करण्यासाठी अधिकारी आणि तांत्रिक पथके वारंवार भेटी देत आहेत. या प्रकल्पासाठी खूप मेहनत घेतली आहे. हा एक मोठा उपक्रम आहे. प्रत्येक पैलू पडताळून पाहिल्यानंतरच उद्घाटनाची तारीख ठरवली जाईल.
काश्मीरपर्यंत वंदे भारत चालवण्याची योजना
कटरा ते श्रीनगरपर्यंत रेल्वे कनेक्टिव्हिटी होताच या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा प्रस्ताव आहे. चेन्नईतील रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये तयार झालेला वंदे भारत देशाच्या विविध भागांत याआधीच रुळांवर आला आहे. या मार्गावर कमी डबे असलेल्या गाड्या धावतील.
‘या’ गाड्यांचा प्रस्ताव तयार
यह प्रोजेक्ट पूरा होते ही 32 ट्रेनों (अप-डाउन) को पटरी पर दौड़ाया जाएगा। इसके तहत ट्रेन नंबर 12425/26 न्यू दिल्ली से जम्मूतवी, 12445/46 न्यू दिल्ली से माता वैष्णो देवी कटरा, 16031/32 चेन्नई सेंट्रल से माता वैष्णो देवी कटरा, 11449/50 जबलपुर से माता वैष्णो देवी कटरा, 16787/88 तिरुनेलवेली ते माता वैष्णो देवी कटरा, 16317/18 कन्याकुमारी ते माता वैष्णो देवी कटरा, 19803/04 कोटा ते माता वैष्णो देवी कटरा, 12331/32 हावडा ते जम्मू तवी आणि इतर सात गाड्या.