National Tourism Day : भारतातील 7 प्रसिद्ध पर्यटन स्थळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत हा देश (National Tourism Day) विविधतेने नटलेला आहे. देशात अनेक जातीचे, वेगवेगळ्या भाषांचे, वेगवेगळ्या समाजाचे लोक अगदी गुण्यागोविंदाने राहतात. भारतात फिरण्यासाठी अशी अनेक पर्यटक स्थळे आहेत ज्याठिकाणी भेट देऊन तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही खास वेळ घालवू शकता आणि आपला आनंद साजरा करू शकता. यातील काही ठिकाणी ऐतिहासिक वास्तू, ऐतिहासिक मंदिरे तुम्हाला पाहायला मिळतील. जम्मू काश्मीर सारख्या भागात तुम्हाला बर्फाळ प्रदेशाचा अनुभव घेता येईल, गोव्यासारख्या ठिकाणी मस्त असा समुद्रकिनार पाहायला मिळेल. तर काही ठिकाणी लांबच लांब डोंगररांगा आणि टेकड्या पहायला मिळतील. आज 25 जानेवारी म्हणजे राष्ट्रीय पर्यटन दिवस .. त्यानिमित्ताने जाणून घेऊया भारतातील टॉप 7 पर्यटन स्थळांबाबत …..

new delhi

1) नवी दिल्ली – New Delhi

भारताची राजधानी दिल्ली दिलवालोंकी दिल्ली या नावाने प्रसिद्ध आहे. (National Tourism Day) अनेक ऐतिहासिक वास्तूंनी नटलेलं हे शहर देश- विदेशातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. दिल्लीत मुघल काळातील स्मारके, मंदिरे, हेरिटेज साइट्स, परफॉर्मिंग आर्ट स्थळे, रंगीबेरंगी बाजार, शॉपिंग मॉल्स, तारांगण, संग्रहालये आणि रेस्टॉरंट्स आहेत. तसेच भारतीय राजकारणाचे मुख्य केंद्र असलेल्या या शहरात राष्ट्रपती भवन, भारताची संसद आणि इंडिया गेट सारखी महत्त्वाची राजकीय ठिकाणे आहेत. याशिवाय दिल्लीतील लाल किल्ला, इंडिया गेट, अक्षरधाम मंदिर, जामा मशीद, सरोजिनी नगर बाजार इत्यादी अनेक ठिकाणी भेट देऊन तुम्ही तुमचा प्रवास संस्मरणीय बनवू शकता.

taj mahal

2) आग्रा ताजमहाल – The Taj Mahal

जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेलं ताजमहाल आग्रा येथे आहे. (National Tourism Day) समृद्ध ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले हे सुंदर शहर यमुना नदीच्या काठावर वसलेले आहे. ताजमहालचे अफाट सौंदर्य प्रेमाची कहाणी सांगते. पांढऱ्या संगमरवरीने बनलेला ताजमहाल शाहजहानने त्याची पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ बांधला होता. वास्तुकला प्रेमी आणि इतिहास रसिकांसाठी पर्यटनासाठी हे सर्वात आवडीचे ठिकाण ठरत. तुम्ही आग्राला कितीही वेळा भेट दिली तरी ताजमहाल आणि इतर स्मारकांचे आकर्षण कधीही कमी होणार नाही.

kashmir

3) काश्मीर- भारताचा स्वर्ग – (Kashmir) 

काश्मीरला भारताचे स्वर्ग म्हटले जाते. या ठिकाणच्या सुंदर दऱ्या तुम्हाला अशाप्रकारे भुरळ घालतील की तुम्ही फक्त त्याच्याकडेच पहात राहाल. बर्फाच्छादित उंच पर्वत, झाडे-झुडपे पाहून तुम्ही निसर्गाच्या रंगात रंगून जाल. काश्मीरमधील एकूण दृश्य पाहता स्वर्गापेक्षा काय कमी नाही असा फील तुम्हाला येईल. काश्मीर येथील गुलमर्ग, दल सरोवर, सोनमर्ग, पहलगाम इत्यादी सुंदर ठिकाणे तुम्हाला भुरळ घालतील आणि तुम्हाला येथे पुन्हा पुन्हा येण्याची इच्छा निर्माण करतील.

goa

4) गोवा – (National Tourism Day)

भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून अनेकजण गोव्याला पसंती देतात. मस्त असा समुद्रकिनारा, आरामदायी जीवनशैली आणि पार्ट्यांसाठी गोवा प्रसिद्ध आहे. दरवर्षी ख्रिसमस नाताळ आणि नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरातून अनेक पर्यटक गोव्याला आवर्जून येतात आणि आपली सुट्टी एन्जॉय करतात. तुम्ही शांततापूर्ण आणि जास्त खर्च न होता सुट्टी एन्जॉय करणार असाल तर ऑफसीझनमध्ये गोव्याला नक्की भेट द्या. गोव्यात तुम्हाला एकाच दिवसात अनेक प्रकारच्या गोष्टींचा आनंद घेण्याची संधी मिळेल. गोव्यातील चर्च किंवा मंदिरात जाऊन तुम्ही काही क्षणांसाठी मनःशांती सुद्धा करू शकता.

jaipur

5) जयपूर – गुलाबी शहर Jaipur Pink City

राजस्थान मधील हे शहर ‘पिंक सिटी’ (National Tourism Day) म्हणजेच गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. प्राचीन वास्तू , सुंदर तलाव, विस्तीर्ण वाळवंट, भव्य राजवाडे आणि प्राचीन किल्ल्यांनी नटलेलं हे शहर भारतीय पर्यटनाचे मुख्य आकर्षण मानले जाते. येवढच नव्हे तर इथली रोड ट्रिप तुम्हाला राजस्थानी संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवून आणेल. राजस्थानमध्ये तुम्ही अंबर किल्ला, जयगड किल्ला, नाहरगड किल्ला, जंतर मंतर, रामबाग पॅलेस इ. ठिकाणांना भेट देऊ शकता.

munnar

6) मुन्नार – Munnar

तुम्ही जर निसर्गरम्य वातावरणाचा आनंद (National Tourism Day) घेत सुट्टी एन्जॉय करण्याचा विचार करत असाल तर केरळ राज्यातील मुन्नार हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे. मुन्नार हे भारतातील सर्वात शांत आणि सुंदर पर्यटन स्थळांमध्ये गणले जाते. मुन्नार येथील हिल स्टेशन्स, निसर्गरम्य दऱ्या, फॉरेस्ट, धबधबे, राष्ट्रीय उद्याने, चहा आणि मसाल्यांचे मळे नक्कीच तुमचं मन मोहित करेल. नैसर्गिक सौंदर्य हेच मुन्नारचे मुख्य आकर्षण आहे त्यामुळे तुम्ही याठिकाणी भेट देऊन पर्यटनाचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.

manali

7) मनाली – Manali

हिमाचल प्रदेशच्या कुल्लू खोऱ्यात वसलेले मनाली पर्यटकांना आपल्या नैसर्गिक सौंदर्याने आणि शांततेने आकर्षित करते. देशभरातील अनेक पर्यटक मोठ्या संख्येने मनालीत येऊन आपली सुट्टी एन्जॉय करतात. मनाली येथील बर्फाच्छादित पर्वत, घनदाट जंगले, नदीच्या खोऱ्या आणि हिल स्टेशन पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे. राफ्टिंग, ट्रेकिंग, स्कीइंग, झिपलाइनिंग आणि पॅराग्लायडिंगसारखे साहसी खेळांचा आनंद तुम्ही मनालीत घेऊ शकता. शिवाय, मनाली आपल्या समृद्ध संस्कृती आणि तीर्थक्षेत्रांसाठी प्रसिद्ध आहे.