10 वी उत्तीर्णांसाठी खुशखबर !! नेव्हल डॉकयार्डमध्ये ‘या’ पदांसाठी मेगाभरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी उत्तीर्णांसाठी मोठी खुशखबर आहे. विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्डमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून 275 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 02 जानेवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – नेव्हल डॉकयार्ड, विशाखापट्टणम

पद संख्या – 275 पदे

भरली जाणारी पदे –

1) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 36 पदे
2) फिटर – 33 पदे
3) शीट मेटल वर्कर – 35 पदे
4) कारपेंटर – 27 पदे
5) मेकॅनिक (डिझेल) – 23 पदे
6) पाईप फिटर – 23 पदे
7) इलेक्ट्रिशियन – 21 पदे
8) R & AC मेकॅनिक – 15 पदे
9) वेल्डर (G &E) – 15 पदे
10) मशिनिस्ट – 12 पदे
11) पेंटर (जनरल) – 12 पदे
12) इंस्ट्रूमेंट मेकॅनिक – 10 पदे
13) MMTM – 10 पदे
14) फाउंड्री मन – 05 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2023

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता

50% गुणांसह 10वी उत्तीर्ण

65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI

वय मर्यादा – 02 मे 2009 रोजी किंवा त्यापूर्वी जन्मलेले उमेदवार.

निवड प्रक्रिया –

या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी, मुलाखत आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – 

ऑफिसर-इन-चार्ज (अप्रेंटिससाठी), नेव्हल डॉकयार्ड अॅप्रेंटिस स्कूल, व्हीएम नेव्हल बेस S.O., PO, विशाखापट्टणम- 530014, आंध्र प्रदेश

महत्वाच्या तारखा – 

लेखी परीक्षेची तारीख – 28 फेब्रुवारी 2023

लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तारीख – 3 मार्च 2023.

मुलाखतीची तारीख – मुलाखत 6, 7, 9 आणि 10 मार्च रोजी होईल. (Job Notification)

वैद्यकीय चाचणीची तारीख – 16 ते 28 मार्च दरम्यान घेतली जाईल.

प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख – 2 मे 2023.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – APPLY