Navi Mumbai Metro Line 1 : अखेर नवी मुंबईकरांचे स्वप्न साकार; आजपासून ‘या’ मार्गावर धावणार मेट्रो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवी मुंबईकरांसाठी स्वप्न असणारी मेट्रो बहुप्रतीक्षेनंतर रुळावर (Navi Mumbai Metro Line 1) धावणार आहे. या मेट्रोसाठी नवी मुंबईकरांना प्रचंड वाट पाहावी लागली आहे. मेट्रो सुरु होत नसल्यामुळे अनेकांच्या प्रवासाचे हाल होत असत. हे जाणून घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रोला रुळावर धावण्याची परवानगी दिली आणि नवी मुंबईकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता या मेट्रो वेळापत्रक कसे असेल ते जाणून घेऊयात.

बेलापूर ते पेंधर असा असेल रूट- Navi Mumbai Metro Line 1

बेलापूर ते पेंधर अशी ही मेट्रो धावणार आहे. यामध्ये एकूण 11 स्थानकाचा समावेश असणार आहे. बेलापूर ते पेंधर हा एकूण 11.10 किलोमीटरचा प्रवास आहे. मेट्रोमुळे हा प्रवास काही मिनिटामध्ये पूर्ण करणे शक्य होणार आहे.

आजपासून सुरु होणार मेट्रो

आजपासून सकाळी 6 वाजता पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंधर या मार्गांवर मेट्रो (Navi Mumbai Metro Line 1) धावणार आहे.  तिची शेवटची फेरी ही रात्री 10 पर्यंत असणार आहे. या मार्गावर दर 15 मिनिटाच्या अंतरावर मेट्रो धावणार असून यामध्ये प्रवासी संख्या ही 1 हजार 100 एवढी असणार आहे. मुंबई मेट्रो सुरु करण्यासाठी मुंबईकरांनी अनेक दिवस वाट पाहिली. नेहमी त्याची निराशाच झालेली दिसून आली. त्यामुळे कोणतीही नवी गोष्ट सुरु करण्याधी त्या अगोदर त्याचे उदघाटन केले जाते. मात्र यावेळी असे होणार नसून मेट्रोचे उदघाटन न करताच मेट्रो सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतला आहे.

कोणत्या स्थानकाला दिली जाईल भेट?

पेंधर ते बेलापूर असा मेट्रोचा रूट असून या दरम्यान एकूण 11 स्थानके येतात. त्यामध्ये पेंधर बेलापूर टर्मिनल, आरबीआय कॉलनी, बेलपाडा, उत्सव चौक, केंद्रीय विहार, खारघर गाव, सेंट्रल पार्क, पेठपाडा, अमनदूत आणि पेठाली – तळोजा या ठिकाणाचा समावेश आहे.

कसे असेल मेट्रोचे तिकीट?

मुंबई मेट्रोचे दर किलोमीटरच्या अंतरावर अवलंबून असणार आहे. त्यामध्ये जर प्रवाश्याने 2 किलोमीटरचा प्रवास केला तर त्यास 10 रुपये भरावे लागतील. त्यानंतर 2 ते 4 साठी 15 रुपये, 4-6 किलोमीटर साठी 20 रुपये, 6-8 साठी 25, 8-10 साठी 30 रुपये, तर 10 किलोमीटरच्या पुढच्या प्रवासासाठी 40 रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे हा प्रवास अत्यन्त सोयीस्कर आणि खिशाला परवडेल असा असणार आहे.