Navi Mutual Fund : फक्त 10 रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे अशा प्रकारे तयार करा मोठा फंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Navi Mutual Fund : आपल्यातला प्रत्येकजण भविष्यासाठी कुठे ना कुठे गुंतवणूक करत असतो. त्यासाठी शेअर मार्केट, FD म्युच्युअल फंडस् सारखे अनेक पर्याय देखील उपलब्ध आहेत. यामध्ये शेअर मार्केट मोठा नफा देत असले तरी त्यामध्ये मोठी जोखीम देखील असते. तसेच ज्यांना कमी जोखमीमध्ये निश्चित रिटर्न असतो ते FD मध्ये गुंतवणूक करतात. याबरोबरच म्युच्युअल फंडस् देखील मोठा नफा मिळवून देण्यात पुढे आहेत.

2 Small-Cap Mutual Fund SIPs, Ticked Upto 169% Return: Morningstar Rated - Goodreturns

जर आपणही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूकीचा विचार करत असाल तर Navi Mutual Fund च्या योजनांमधील नवीन गुंतवणूक आणि अतिरिक्त गुंतवणूक या दोन्हीसाठीची किमान रक्कम सध्याच्या 1000, 500 आणि 100 रुपयांवरून कमी करून 10 रुपये (1 रुपयाच्या पटीत) केली गेली आहे. 27 सप्टेंबर म्हणजेच आजपासून हा बदल लागू झाला आहे. हे लक्षात घ्या कि, इक्विटी-लिंक्ड सेव्हींग स्कीम वगळता Navi Mutual Fund च्या सर्व योजनांमध्ये अर्जासाठीची किमान रक्कम कमी करण्यात आली आहे.

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीकडे नेहमीच दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. म्युच्युअल फंडामध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास चक्रवाढ व्याजाचे जबरदस्त फायदे मिळतात.

इंटरनेशनल म्यूचुअल फंड: यहां 3 साल में पैसे हो गए डबल से भी ज्‍यादा, कैसे करें निवेश? | The Financial Express

तीन वर्षांचा लॉक-इन कालावधी

ELSS या म्युच्युअल फंडांचा लॉक इन कालावधी 3 वर्षांचा असतो. यामुळे जर आपल्या चांगला रिटर्न मिळवायचा असेल तर या योजनेमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करत रहा.

कर कपातीचा लाभ मिळेल

यामध्ये आपल्याला 1.50 लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत कर सवलत मिळू शकेल. यामध्ये एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कलम 80C अंतर्गत कर सूट मिळू शकेल.

ICICI Bank देगा 1 करोड़ रुपए तक लोन, आपकी बचत ही बन जाएगी अमानत | Zee Business Hindi

नवी लिक्विड फंड, नवी रेग्युलर सेव्हिंग्ज फंड (प्रामुख्याने डेट पेपर्समध्ये गुंतवणूक करणारी हायब्रीड योजना) आणि नवी फ्लेक्सी कॅप फंड यांसारख्या योजनांसाठीच्या अर्जाची किमान रक्कम 1,000 रुपयांवरून कमी करून 10 रुपये (1 रुपयाच्या पटीत) करण्यात आली आहे. या योजनांसाठीची किमान अतिरिक्त अर्जाची रक्कम 100 रुपयांवरून 10 रुपये करण्यात आली आहे. हे Navi Mutual Fund च्या इक्विटी हायब्रीड फंडाला देखील लागू होते, जी प्रामुख्याने इक्विटीमध्ये गुंतवणूक करणारी हायब्रीड आणि लार्ज आणि मिडकॅप फंड योजना आहे.

Navi Mutual Fund च्या निफ्टी 50 इंडेक्स फंड, निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड, निफ्टी बँक इंडेक्स फंड, यूएस टोटल स्टॉक मार्केट फंड ऑफ फंड, निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्स फंड, नॅसडॅक 100 फंड ऑफ फंड आणि निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स फंड यासारख्या योजनांसाठीच्या अर्जाची रक्कम 500 रुपयांवरून 10 रुपये करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.navimutualfund.com/

हे पण वाचा :

‘या’ Multibagger Stock ने गेल्या 6 वर्षात दिला 497% रिटर्न

Multibagger Stocks : ‘या’ दोन कंपन्यांकडून आपल्या भागधारकांना मिळणार बोनस शेअर्सची भेट

Amazon Sale मध्ये अर्ध्या किंमतीत मिळत आहेत ‘हे’ प्रीमियम 4K स्मार्ट टीव्ही

FD Rates : आता ‘या’ 2 बँकांनी देखील FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन व्याजदर तपासा

45% सवलतीत Suzlon Energy चे शेअर्स खरेदी करण्याची संधी !!! कसे ते जाणून घ्या