Navratri 2024 | संपूर्ण भारतात आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे. या नवरात्रीमध्ये अनेक लोक हे देवीच्या वेगवेगळ्या मंदिरांना भेट देत असतात. असे म्हणतात या नऊ दिवसात देवी ही पृथ्वीवर वास्तव करत असते. आणि त्यांच्या भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतात. त्यामुळे अनेक लोक हे मंदिरात जातात. अशातच मुंबईतील एक महालक्ष्मीचे मंदिर आहे. हे मंदिर खूप प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर अरबी समुद्राच्या काठावर भुलाई देसाई मार्गावर आहे. या ठिकाणी अनेक लोक हे जात असतात. या महालक्ष्मीचे मंदिर समुद्राच्या अगदी जवळ आहे. या मंदिरातील वेगवेगळ्या अतिशय सुंदर अशा मूर्ती आहे. गर्भामध्ये महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती या तीन देवीच्या मूर्ती एकत्र आहे. तिन्ही मूर्ती सोन्याच्या बांगड्या आणि हारांनी सजवलेले आहे. तसेच हे मंदिर दिसायला अत्यंत सुंदर आहे. दारापाशी सुंदर कोरीव कामही केलेले आहे. या ठिकाणी विविध देवतांचे आकर्षक पुतळे देखील पाहायला मिळतात.
या मंदिराला खूप मोठा इतिहास आहे. आणि तो इतिहास देखील खूपच रंजक आहे. ब्रिटिशांनी महालक्ष्मी प्रदेश वरळी प्रदेशाला जोडण्यासाठी ब्रीच मार्ग बनवण्याची योजना केली होती. त्यावेळी समुद्राच्या वादळी या कामात सारखी विघ्न येत होती. त्यावेळी देवी लक्ष्मी एक ठेकेदार रामजी शिवाजी यांच्या स्वप्नात आली. आणि समुद्राच्या देवीच्या ती मूर्ती काढून मंदिर स्थापन करण्याचा आदेश दिला. रामजी यांची तसेच केले आणि यशस्वीरिता ब्रीच तयार झाला.
या देवीला संपत्तीची देवी देखील मानले जाते. तुमच्या घर आणि व्यवसायात सुख-समृद्धी घेण्यासाठी अनेक लोक महालक्ष्मीची पूजा करतात. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा आई पूर्ण करत असते. भाविक महालक्ष्मी चा मुखवटा पाहू शकत नाही. कारण दिवसा त्या मूर्तीवर मुखवटा चढवलेला असतो. पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मूळ मूर्ती पाहण्यासाठी रात्री यावे लागते.
या देवीवर अनेकांची खूप श्रद्धा आहे. रात्री या देवीचा मुखवटा चढवल्यानंतर दरवाजा बंद होतात. आणि सकाळी स्वच्छता झाल्यानंतरच देवींचा अभिषेक होतो. आणि त्यानंतर भक्तांना दर्शन दिले जाते. या मंदिरात एक भिंत आहे. ज्यावर तुम्हाला अनेक दाणे दिसतील असे म्हणतात की, जर ही नाणी भिंतीवर चिकटली तर देवी त्यांची इच्छा पूर्ण करते.