Navratri 2024 | भारतातील ‘या’ प्रसिद्ध देवीच्या मंदिरांना नवरात्रीत नक्की भेट द्या; जाणून घ्या सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Navratri 2024 | आपल्या भारतामध्ये प्रत्येक सण उत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. अशातच आजपासून म्हणजेच 3 ऑक्टोबरपासून संपूर्ण भारतात नवरात्री उत्सवाला सुरुवात झालेली आहे. या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. असे म्हणतात की, या नऊ दिवसात देवी पृथ्वीवर येत असते. आणि त्यांच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करत असते. आपल्या भारतामध्ये देवीची अनेक मंदिर आहेत. त्या मंदिरांना शक्तीपीठ म्हणून स्थापना करण्यात आलेली आहे. या ठिकाणी वर्षभर भक्तांची खूप गर्दी असते. परंतु नवरात्रीच्या उत्सवात या मंदिरात लाखोंनी भक्त येत असतात. आता भारतातील ही कोणती मंदिर आहे ते आपण जाणून घेणार आहोत.

वैष्णोदेवी मंदिर जम्मू आणि काश्मीर | Navratri 2024

वैष्णोदेवी हे भारतातील सगळ्यात प्रसिद्ध असे मंदिर आहे. हे प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर माता वैष्णोदेवीला समर्पित आहे. हे मंदिर जम्मू काश्मीरमध्ये आहे. वर्षभर या ठिकाणी भक्तांची खूप मोठी गर्दी होते. नवरात्रीच्या दिवसात तर या ठिकाणी जास्त गर्दी असते.

वनशंकरी मंदिर कर्नाटक

हे मंदिर कर्नाटक मध्ये आहे कर्नाटकातील दुर्गा देवीचे हे सगळ्यात प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर जंगलाच्या मध्यभागी आहे. त्यामुळे या मंदिराला वनशंकर असे नाव देखील आहे. या मंदिरात देवीची काळ्या रुपात मूर्ति स्थापन करण्यात आलेली आहे. या मंदिराची निर्मिती जवळपास 17 व्या शतकात करण्यात आलेली आहे.

दुर्गा मंदिर वाराणसी

हे मंदिर भारतातील सगळ्यात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. वर्षभर या ठिकाणी खूप गर्दी असते. हे वाराणसी शहरात असल्यामुळे या ठिकाणी अगदी सहज पोहोचता येते. तुम्ही नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी भेट देऊ शकता. वाराणसी स्टेशन वरून केवळ दोन किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.