नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद; प्रत्युत्तरादाखल गोळीबारात एका नक्षलवाद्याचा खात्मा

संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । छत्तीसगडमध्ये नक्षलवादाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. विजापूर जिल्ह्यात सोमवारी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत तर एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे.

सोमवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास कोब्रा बटालियनचे कमांडो शोधीमोहीम राबवत असताना, त्यांच्यावर इरापल्ली गावाजवळ नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. ज्यामध्ये दोन जवान शहीद झाले. तर कमांडोंनी नक्षलवाद्यांना दिलेल्या प्रत्युत्तरात एका नक्षलवाद्याचा खात्मा झाला. या चकमकीत अन्य चार कमांडो जखमी झाल्याची देखील माहिती आहे.

या चकमकीत आणखी चार जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. चकमकीनंतर नक्षलवाद्यांनी पळ काढल्यामुळे त्यांच्याकडे असणारा शस्त्रसाठा जप्त करण्यात जवानांना यश आलं आहे.

 

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.