NCC च्या विद्यार्थ्यांनी गोळा केला 100 किलो कचरा; बापूजी साळुंखे महाविद्यालकडून प्रीतिसंगमावर स्वच्छता मोहीम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड । कृष्णा कोयना नदीचा संगम होणारे कराड शहरातील प्रीतिसंगम येथे आज NCC च्या विद्यार्थ्यांनी 100 किलो कचरा गोळा केला. केंद्र सरकारच्या पुनीत सागर अभियानांतर्गत शिक्षण महर्षी बापूजी कॉलेज, कराड यांनी स्वच्छता मोहीम केली. यावेळी महेश गायकवाड, प्रभारी प्राचार्य शिक्षण महर्षी बापूजी कॉलेज, कराड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पर्यावरणाचे महत्व पटवून दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन कि बात कार्यक्रमात पुनीत सागर अभियानाची सुरवात केली होती. यांत्रगत १९ महाराष्ट्र बटालियन यांनी कमांडर आणि कर्नल यांच्या आदेशानुसार आज प्रीतिसंगम घाट येथे नदीकिनारी स्वच्छता मोहीम केली. यावेळी तब्ब्ल १०० किलो कचरा गोळा करण्यात आला. यामध्ये प्लास्टिकचे ग्लास, बाटल्या अशा घनकचऱ्याचा समावेश होता अशी माहिती प्राचार्य गायकवाड यांनी दिली.

दरम्यान, भारत सरकार व एनसीसी निदेशयल यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात पुनीत सागर अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत समुद्र, नदी, तलाव, धरणे आदी ठिकाणी स्वच्छता करून प्लास्टिक गोळा करण्यात येत आहे. 19 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर जे. पी. सत्तीगिरी,  अॅडम ऑफिसर दिनेश कुमार झा यांच्या आदेशानुसार हे अभियान राबविण्यात आले. अभियान यशस्वी करण्यासाठी एनसीसी छात्रसैनिकांसोबतच एनएसएस स्वयंसेवक त्याचबरोबर सुभेदार मेजर पी. बी. थापा, सुभेदार नानासाहेब यादव, प्रा. रत्नाकर कोळी, प्रा. स्नेहल वरेकर, प्रा. डॉ. अवधूत टिपूगडे, प्रा. सुभाष कांबळे, प्रा. सचिन बोलाईकर, प्रा. अभिजीत दळवी, प्रा. डॉ. शितल गायकवाड, प्रा. दिपाली वाघमारे  तसेच महाविद्यालयातील सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.