बारामतीत नणंद VS भावजय सामना रंगणार!! राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज अजित पवार गटाकडून बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघासाठी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता बारामतीत नणंद विरुद्ध भावजय म्हणजेच सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे. आज शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार, बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना तिकीट देण्यात आले आहे. तसेच, आजच बारामतीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विजय शिवतारे यांनी माघार घेतली आहे. या सर्व घडामोडीनंतरच आता अजित पवार गटाकडून बारामतीत सुनेत्रा पवार यांना उभे केले जाईल हे घोषित करण्यात आले आहे.