राष्ट्रवादीचा बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार; भाजप नेत्याच्या ट्विटने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार असून आपण पत्रकार परिषद घेऊन त्या नेत्याचे नाव उघड करू असं खळबळजनक ट्विट भाजप नेते मोहित कंभोज यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चाना उधाण आले आहे.

मोहित कंबोज यांनी एकामागून एक ३ ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा इशारा दिला आहे. राष्ट्रवादीचा एक मोठा मोठा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यासोबत आर्थर रोड जेलमध्ये असेल, असे मोहित कंबोज म्हणाले. याबाबत आपण लवकरच पत्रकार परिषद घेणार असून या नेत्याचा पर्दापाश करणार आहोत असेही ते म्हणाले. त्यामध्ये देश आणि विदेशालील मालमत्तांची यादी, बेनामी कंपन्यांची नावे, गर्लफ्रेंडच्या नावे घेतलेल्या मालमत्ता, विविध खात्यांचा कारभार सांभाळताना केलेला भ्रष्टाचार, कुटुंबाचे उत्पन्न आणि मालमत्तांची यादी असे जाहीर करणार आहे, असे कंबोज यांनी सांगितले आहे.

आपल्या तिसऱ्या ट्विटमध्ये तर त्यांनी थेट संकेत दिले आहेत. राज्यातील सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी झाली पाहिजे. ज्या घोटाळ्याची फाईल परमबीर सिंह यांच्या काळात, 2019 साली बंद करण्यात आली होती अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात राजकीय खळबळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.