Monday, January 30, 2023

’50 खोके, एकदम OK’ ; हिवाळी अधिवेशनापूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांचे आंदोलन

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन (winter session) नागपूर येथे सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पाहिल्या दिवशी गाजणार असल्याची शक्यता वर्तवली जात होते. त्यानुसार पहिल्या दिवशी विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायर्यांवर जाऊन शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात ’50 खोके, एकदम ओके’ अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात विरोधकांकडून अनेक मुद्यांवरून सरकारवर निशाणा साधला जाणार आहे. दरम्यान सकाळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेतील नेत्यांनी एकत्रित येत आंदोलन केले.

- Advertisement -

यावेळी महाराष्ट्रातील महापुरुषांची बदनामी करणाऱ्या राज्यपाल भगसिह कोश्यारी यांना तत्काळ हटवावे अशी मागणी करत ‘बोम्मई सरकार, ईडी सरकार हाय हाय, 50 खोके एकदम ओके; अशा घोषणाही दिल्या.