अब्दुल सत्तारांचे कपडे फाडणाऱ्यास 10 लाखांचं बक्षीस; राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला नेत्याने दिले आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे नेते व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. केवळ माफी मागून चालणार नाही तर अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करा, त्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यपालांकडे करण्यात आली. आता सत्तार हे महाराष्ट्रात जिथं कुठं दौऱ्यावर असतील तिथे कार्यकर्त्यांनी त्यांचे कपडे फाडावेत. त्याचे कपडे फाडणाऱ्याला मी स्वतः 10 लाख रुपयांचं बक्षीस देईन, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रेखा तौर दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंघटीत कामगार विभाग प्रदेशच्या उपाध्यक्ष रेखा तौर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, अब्दुल सत्तार यांनी जे बेताल वक्तव्य केले आहे. त्याचा जाहीर निषेध मी करते. त्यांनी सुप्रिया ताईंचाच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व महिलांचा अपमान केला आहे. ते सुप्रियाताईंना भिकारी म्हटले आहेत. अब्दुल सत्तार, तुला मी सांगू इच्छिते, सुप्रिया ताईंजवळ एवढं आहे की त्या तुला सात पिढ्या विकत घेऊ शकतील. पन्नास खोके, एकदम ओके. शिंदे गटाने पन्नास खोके घेऊन सरकार ओरबाडून आणली आहे.

महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना मी विनंती करते की, ते जिथे कुठे दौऱ्यावर असतील, त्याचे कपडे फाडा. जे कुणी कपडे फाडेल, त्याला 10 लाख रुपये मी बक्षीस देईन. ज्यांचं मन दुखावलं त्याची माफी मागतो म्हणाले, पण अब्दुल सत्तार तुझी दिलगिरी आणि माफीही नको. मुख्यमंत्र्यांना विनंती करते की, महिलांचा अपमान करणाऱ्यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा.