राष्ट्रवादी पक्षातून कोणीही फुटणार नाही, लवकरच 16 आमदार निलंबित होणार : आ. शशिकांत शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे काही आमदारांसोबत भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होत आहे. या चर्चेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राष्ट्रवादी पक्षातून कोणीही आमदार फुटणार नाही. अफवा वावड्या या कायमच उठत असतात. लवकरच 16 आमदार शंभर टक्के अपात्र ठरणार आहेत, असा विश्वास आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

आ. शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, 16 आमदार अपात्र ठरले तर त्यांना पुढील सहा वर्षासाठी आमदारकी लढवता येणार नाही. यामुळे सरकार अस्थिर होईल. तुमच्या धमक असेल तर लोकशाहीच्या मार्गाने निवडणुका लढवून दाखवा दिल्लीतील यंत्रणेला देखील खात्री पटली की तुमच्यात खासदार निवडून येणार नाहीत आमदारकी धोक्यात आहे.

जनतेतून नाराजीचा सूर आहे. राष्ट्रपती लागवट अजून एक वर्ष पुढे निवडणूक असल्यामुळे लागू करता येईना. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर दिल्लीच्या, बिहारच्या मुख्यमंत्र्यांबाबत केला जातोय तो प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे. याचा उद्रेक पाहायला मिळेल, असे शिंदे यांनी म्हंटले.

आ. महेश शिंदे गाव लुटणारा गब्बरसिंग : शिंदे

विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद येथे कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडीच्या पाणी प्रश्नावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांची भेट घेत त्यांच्याशी रामोशीवाडीतील पाणीटंचाईच्या प्रश्नाबाबत चर्चा केली. यानंतर माध्यमांशी बोलताना आ. शिंदे यांनी ‘मला शोले मधला अन्सारी बोलत असतील तर ते शोलेमधले गब्बर आहेत. जे रोज गाव लुटायला यायचा हे जिल्हा लुटायचा प्रयत्न करतात, अशी टीका आ. शशिकांत शिंदे यांनी आ. महेश शिंदे यांच्यावर केली.