Monday, February 6, 2023

राष्ट्रवादीच्या आमदाराची अडीच महिन्याच्या बाळासह अधिवेशनास हजेरी; केली ‘ही’ महत्वाची मागणी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिकच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या अडीच महिन्याच्या बाळासह दाखल झाल्या. अडीच महिन्याच्या प्रशंसकसह त्यांना पाहताच उपस्थितांच्याही भुवया उंचावल्या. यावेळी “विधिमंडळ परिसरात महिला आमदारांना आपल्या बाळांची काळजी घेता यावी यासाठी हिरकणी कक्षाची व्यवस्था राज्य सरकारने करावी. कारण उद्या भविष्य काळात अजून महिला आमदार निवडून येणार असून त्याही आपल्या बाळासह याठिकाणी येऊ शकतील,” अशी मागणी आमदार अहिरे यांनी केली.

विधिमंडळाच्या अधिवेशनास विधिमंडळ परीसरात बाळासह आमदार अहिरे दाखल होताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, सरकार कोणाचे असो ठाकरेंचे असो किंवा शिंदेंचे असो. शेवटी मतदार संघातील प्रश्न सोडवणे आम्हा आमदारांना खूप महत्वाचे असते. वातावरण कसेही असले तरी आपले प्रश्न आम्हाला मांडण्यासाठी याठिकाणी यावे लागते.

- Advertisement -

एक आमदार म्हणून माझं काही कर्तव्य आहे. माझ्या मतदार संघातील अनेक प्रश्न आहेत. ते मांडण्याची अधिवेशनात आम्हाला संधी असते. आणि ती संधी मला गमवायची नव्हती. माझे बाळ अडीच महिन्याचं झाला आहे. पण बाळाला सोडून येता नव्हते. म्हणून त्यालाही सोबत घेऊन आले आहे. कारण ते खूपच लहान आहे. बाळाची खूप काळजी घेणार असून त्याची व्यवस्था करून अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होणार असल्याचे आमदार अहिरे यांनी सांगितले.