शरद पवारांनी साधला शिंदे गटातील आमदारांवर निशाना; म्हणाले की, आत्ताचे खोकेवाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
पूर्वीच्या काळी एखाद्याकडे खोके असले कि त्याला खोकेवाले खोकेवाले असे म्हटले जात होते. त्यामध्ये कोरेगावात खोकेवाले भोसले म्हणुन डी पी भोसले परिचित होते. आजचे खोकेवाले असे नाही. त्या काळातील भोसले तुम्हाला हवं ते घ्या असं म्हणायचे. मात्र, आत्ताचे नाही. आजच्या खोक्यांवर मी आता जास्त काही बोलत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यां‌नी शिंदे गटातील आमदारांना लगावला.

कोरेगाव येथील रयत शिक्षण संस्थेचा आज कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास खा. शरद पवार यांनी शिंदे गटावर निशाना साधला. यावेळी ते म्हणाले की, पूर्वी दि. पी. भोसले सर्वांसमोर खोके ठेवायचे. एकदा खोके ठेवले कि समोर असणाऱ्यांना सांगायचे की तुम्हाला हवंय ते घ्या. आताचा काळ वेगळा आहे तो पूर्वीसारखा राहिलेला नाही. डी. पी. भोसले यांनी या संस्थेच्या उभारणीसाठी अतिशय कष्ट केले.

दरम्यान, सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये खासदार शरद पवार यांनीही शिंदे गटातील आमदारांवर खोकेवाले असे म्हणून टोला लगावला आहे. आता पवारांच्या या टोलेबाजीला शिंदे गटातील आमदार काय उत्तर देणार? हे पहावे लागणार आहे.