ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा; मातोश्री बाहेर बॅनरबाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दसरा मेळाव्यापूर्वीच शिवसेना आणि शिंदे गटात कुरघोडी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मातोश्री बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस कडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर बॅनर लावले आहे.  ‘एक संघटना, एक विचार, एक मैदान… शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरा अखंड राहू द्या, खूप खूप शुभेच्छा’ अशा आशयाचे पोस्टर लावून मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.विशेष म्हणजे यापूर्वीच काँग्रेसने सुद्धा शिवसेनेला पाठिंबा दर्शवत मातोश्री बाहेर बॅनर लावले होते.

या बॅनर वर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्यासोबत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसत आहे. त्यामुळे राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर देखील महाविकास आघाडीतील एकी दिसून येत आहे.