केतकी चितळे महाराष्ट्रातील मिनी कंगना राणावत?; शिवसेना नेत्याची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विवियाना मॉलप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर अभिनेत्री केतकी चितळे हिने आव्हाडांवर विनयभंगाचे कलम दाखल करा, अशी मागणी केली होती. केतकीच्या या विधानाचा ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. “केतकीच्या रुपाने महाराष्ट्राला मिनी कंगना राणावत जन्माला येत आहे, अशा शब्दात गोऱ्हे यांनी टीका केली आहे.

नीलम गोऱ्हे आज माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, केतकी चितळे यांना मी मदत केली होती. पण तिची काही विधाने पाहता केतकीच्या रूपाने महाराष्ट्रात मिनी कंगना राणावत जन्माला येत आहे, असे वाटते.

जितेंद्र आव्हाड यांनी राजीनाम्याचा निर्णय घेऊ नये. नक्की विनयभंग झाला आहे का ते तपासाव लागेल. त्याचा निर्णय कोर्ट देईल. मी तो व्हिडीओ पाहिला. त्यात जो समोर येईल त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड करताना दिसत आहे. वैर भावना राजकीय नेत्यांच्या मनात येऊ नये. त्यांनी संतापून किंवा दुःखी होऊन राजीनामा देऊ नये, असे आवाहन गोऱ्हे यांनी आव्हाड यांना केले.