टीम हॅलो महाराष्ट्र। कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच (एआय) याच्या पुढे काय ? असा सवाल नेहमीच उपस्थित होत असतो. मात्र त्याचे उत्तर आता मिळाले आहे. जगातील सर्वात पहिला ‘आर्टिफिशियल ह्युमन’ किंवा कृत्रिम मानव ज्याला ‘नियॉन’ असं नाव दिलं गेलं आहे याची निर्मिती करण्यात येत आहे. सॅमसंग समर्थित स्टार लॅब यासाठी प्रयन्त करीत आहे. स्टार लॅबचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले प्रणव मिस्त्री यांनी नियॉन हा कृत्रिम मानव सजीव माणसाप्रमाणे आपलाल्या वास्तविक अनुभव देऊ शकेल असे उद्दीष्ट समोर ठेवत याची निर्मिती करत असल्याचे सांगितलं आहे.
निऑन वास्तविक मनुष्यांप्रमाणे बोलू तसेच भावना व्यक्त करू शकणार आहे. इतर रोबोट किंवा गूगल असिस्टंट, अॅमेझॉन,अलेक्सा सारख्या व्यावसायिक एआय जे हवामानाची माहिती किंवा संगीत प्ले करतात यांत आणि निऑन मध्ये गोंधळ होऊ नये म्हणून स्टार लॅब या गोष्टीवर विशेषभर देत आहे. निऑन या कृत्रिम मानवाला हिंदी, स्पॅनिश आणि इतर भाषा देखील समजतात आणि बोलताही येतील.
सीईएस 2020 मध्ये, स्टार लॅब विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती ज्यामध्ये प्रत्येकी एक योग प्रशिक्षक, एक बँकर, एक के-पॉप स्टार, एक न्यूज अँकर आणि एक फॅशन मॉडेल यांचा समावेश असेलेल्या निऑनचे सहा अवतार निर्मित करण्याबाबत प्रत्नशील आहेत. नियॉन हा कृत्रिम मानव इतर वास्तविक लोकांसारखे दिसू शकेल. हूड अंतर्गत, नियॉन प्रोप्रायटरी टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवर चालतात ज्याला कोअर आर 3 म्हणतात यामधील आर 3 म्हणजे रिऍलिटी, रीअलटाइम आणि रिस्पॉन्सिलीटी आहे.
स्टार लॅबचे म्हणणे आहे की, नियॉन हा कृत्रिम मानव अॅमेझॉन अलेक्सा किंवा गूगल असिस्टंट यांच्यापेक्षा भिन्न आहे. नियॉनची निर्मिती निसर्गाच्या लयबद्ध जटिलतेपासून प्रेरणा घेऊन केली जाणारा आहे. नियॉनला मनुष्य कसे दिसते, कसे वागते आणि कसे संवाद साधत आहेत याविषयी विस्तृत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या वर्षाच्या शेवटी निवडक भागीदारांसह नियॉनची बीटा आवृत्ती सादर करण्याची स्टार लॅबची योजना आहे. नवीन एआयबद्दल अधिक माहिती देण्यासाठी कंपनी ‘नियॉन वर्ल्ड 2020’ परिषद घेईल.