हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (NESFB FD Rates) गुंतवणूकदार कायम सुरक्षित आणि फायदेशीर योजनांच्या शोधात असतात. ज्यामध्ये सर्वाधिक गुंतवणूकदारांची पसंती मुदत ठेव अर्थात एफडीला मिळते आहे. FD हा एक चांगला आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. असे असले तरीही एफडीच्या व्याजदरात झालेले बदल आपल्याला मिळणाऱ्या परताव्यावर परिणाम करत असतात. दरम्यान, नुकत्याच झालेल्या व्याजदर वाढीमुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. त्यात काही स्मॉल फायनान्स बँका आपल्या ग्राहकांना FD वर ९ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देत आहेत. त्यांपैकी एका बँकेविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. या बँकेचे नाव नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक असे आहे.
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेने वाढवले FD वरील व्याजदर (NESFB FD Rates)
वृत्तानुसार, नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेने FD व्याजदरात सुधारणा करून ५० बेसिस पॉइंट्सने वाढ केल्याचे समजत आहे. माहितीनुसार, ही बँक आपल्या ग्राहकांना ५४६ ते ११११ दिवसांच्या कालावधीची FD ऑफर करते. ज्यात १ कोटी ते ५ कोटी रुपयांच्या नॉन- रिफंडेबल ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना एकूण ९.७५% इतका व्याजदर दिला जातो. तर, रीडिम करण्यायोग्य ठेवींसाठी ९.५०% टक्के व्याजदर दिला जात आहे. हे व्याजदर आतापर्यंतचे सर्वाधिक व्याजदर असल्यामुळे नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेच्या FD धारकांना या व्याजदरांवर चांगला परतावा मिळतो आहे.
घरबसल्या गुंतवणूक शक्य
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेच्या ग्राहकांना FD मध्ये गुंतवणूक करायची असल्यास त्यांना बँकेत जाण्याची गरज पडत नाही. अगदी घरबसल्या ते या बँकेत FD मध्ये गुंतवणूक करू शकतात. फक्त यासाठी बँकेच्या ग्राहकांना मोबाईल बँकिंग किंवा नेट बँकिंगचा वापर करावा लागतो. (NESFB FD Rates) तसेच, ठेवीदाराच्या बचत खात्यावर त्याच्या FD खात्यातून मासिक वा त्रैमासिक स्वरूपात व्याज जमा होत राहते. ही बँक आपल्या ग्राहकांना डोअरस्टेप बँकिंग, ऑटो रिन्यू, आंशिक पैसे काढणे, पुनर्गुंतवणूक पर्याय आणि कर्ज/ओडी सारख्या सुविधा प्रदान करते.
तर बँकेकडून १ टक्के दंड आकारला जाईल
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेच्या ग्राहकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, जर तुम्ही या बँकेत FD केली असेल तर तुम्हाला कोणत्याही कारणास्तव ती मध्येच बंद करणे फायद्याचे ठरणार नाही. (NESFB FD Rates) कारण, समजा आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेतील FD तिच्या मॅच्युरिटीच्या आधी तोडली तर तुम्हाला या बँकेकडून १ टक्के दंड आकारला जाईल.
अपरिवर्तित रेपो दर
भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात RBI ने पतधोरण आढावा सादर केला आहे. ज्यामध्ये रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही, असे समोर आले आहे. त्यानुसार, RBI नवीनतम रेपो दर हा ६.५% इतकाच राखण्यात आला आहे. (NESFB FD Rates) दरम्यान, महागाई नियंत्रणात ठेवतेवेळी RBI ने सलग आठव्यांदा रेपो दर अपरिवर्तित ठेवल्याने बँक ठेवींवरील व्याजदरात आता कपात होईल याची शक्यता तूर्तास तरी मावळली आहे.