Netflix plans 2024 | आजकाल जगभरात सर्वत्र ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. यावर ऑनलाईन चित्रपट, सिरीयल, डॉक्युमेंटरी, वेबसिरीज पाहिल्या जातात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण घरबसल्या या ओटीटी प्लॅटफॉर्मचा आनंद घेतात. परंतु आता अनेक प्लॅटफॉर्मचे रिचार्ज महाग झाल्यामुळे लोक जास्त ओटीटी वापरत नाही. त्यामुळे आता काही मोबाईल कंपन्या सुद्धा त्यांच्या प्लॅनवर नेटफ्लिक्ससाठी काही ऑफर देत आहेत. अशातच आता या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नेटफ्लिक्स या व्हिडिओज स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने नवीन प्लॅन बाजारात आणलेले आहेत
नेटफ्लिक्स भारतात चार वेगवेगळे म्हणजेच मोबाईल, बेसिक, स्टॅंडर्ड आणि प्रीमियम या चार स्वरूपाचे प्लॅन घेऊन आलेली आहे. या प्लॅनची किंमत 159 रुपयांपासून ते 649 रुपयांपर्यंत असते. आता आपण या चारही सबस्क्रीप्शनबद्दल माहिती जाणून घेऊया.
नेटफ्लिक्स मोबाईल प्लॅन | Netflix plans 2024
या प्लॅनची किंमत 159 रुपये प्रति महिना एवढी असणार आहे. भारतातील हा सगळ्यातील स्वस्त प्लॅन आहे. यामध्ये व्हिडिओची गुणवत्ता ही 480p रिझोल्युशन मिळेल. अँड्रॉइड, टॅबलेट, आयफोन आणि आयपॅड यूजर्स याचा आनंद घेऊ शकतात.
नेटफ्लिक्स बेसिक प्लॅन
या प्लॅनचा कंटेंट तुम्ही तुमच्या फोनशिवाय टॅबलेट, कम्प्युटर आणि टीव्हीवर देखील पाहू शकता. या प्लॅनची किंमत 199 रुपये एवढी आहे. या बेसिक प्लॅनमध्ये तुम्ही नेटफ्लिक्स एकाच वेळी एकाच स्क्रीनवर ऑपरेट करू शकता.यामध्ये तुम्हाला व्हिडिओची गुणवत्ता 720p रिझोल्युशन मध्ये मिळेल.
नेटफ्लिक्स स्टॅंडर्ड प्लॅन
या प्लॅनमध्ये युजर्स एका वेळी दोन वेगळ्या डिवाइसवर कंटेंट पाहू शकतात. या प्लॅनची किंमत 499 प्रति महिना एवढी आहे. यामध्ये व्हिडिओची गुणवत्ता 1080p रिजॉल्युशन एवढी आहे. तुम्ही मोबाईल फोन, टॅबलेट, टीव्ही त्याचप्रमाणे कम्प्युटर या ठिकाणी एकाच वेळी दोन उपकरणांवर पाहू शकता. तसेच तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता.
नेटफ्लिक्स प्रीमियम प्लॅन | Netflix plans 2024
नेटफ्लिक्सच्या या प्रीमियर प्लानची किंमत ही 649 रुपये प्रति महिना एवढी आहे. हा प्लॅन मोठे कुटुंब त्याचप्रमाणे मित्र-मैत्रिणींच्या मोठ्या ग्रुपसाठी डिझाईन केलेले आहे. तर तुम्हाला मोबाईल डिव्हाईस आणि टीव्हीवर 4 k गुणवत्तेवर हाय डेफिनीशन उपलब्ध आहे. तुम्ही सहा वेगवेगळ्या उपकरणांवर देखील हा कंटेंट पाहू शकता. आणि डाऊनलोड करू शकता.