हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – बजाज (Bajaj) ऑटोच्या अनेक उत्तम बाइक्स भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहेत, ज्यांना देशात खूप मागणी आहे. बजाजने नुकतीच भारतीय बाजारपेठेत त्यांची एक उत्तम बाइक लॉन्च केली आहे. यासोबतच बजाजने या बाईकमध्ये कंपनीने अनेक अॅडव्हान्स फीचर्स सोबतच स्टायलिश लुक देखील दिला आहे. ही बाईक होंडा शाईनला थेट टक्कर देऊ शकते. तसेच ही बाईक 125cc सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.
बजाज पल्सर 125 कार्बन फायबर
बजाज (Bajaj) पल्सर 125 नवीन कार्बन फायबर एडिशन सिंगल-सीट आणि स्प्लिट अशा दोन व्हर्जनमध्ये सादर करण्यात आली आहे. ब्लू आणि रेड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये हे सादर करण्यात आले आहे. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनीने या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 89,254 रुपये ठेवली आहे. दुसरीकडे, कंपनीने त्याच्या स्प्लिट-सीट एडिशनची किंमत 91,642 रुपये ठेवली आहे.
पल्सर 125 कार्बन फायबर एडिशन इंजिन
नवीन बजाज (Bajaj) पल्सर 125 सिंगल पॉड हेडलॅम्प युनिटसह ट्विन डेटाइम रनिंग लाइट्स, मस्क्यूलर फ्युएल टँक आणि साइड-स्लंग एक्झॉस्टसह येते. मोटरसायकल 124.4cc, सिंगल-सिलेंडर इंजिनद्वारे समर्थित आहे. हे इंजिन 8,500rpm वर 11.64bhp पॉवर आणि 6,500rpm वर 10.80Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकच्या पुढील बाजूस 240mm डिस्क आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक आहे.
पल्सर 125 कार्बन फायबर मायलेज
नवीन बजाज (Bajaj) पल्सर 125 कार्बन फायबर एडिशन तुम्हाला 65 किमीपर्यंतचे मायलेज देऊ शकते. यासोबतच तुम्हाला उत्तम सेफ्टी फीचर्स देखील बघायला मिळू शकतात. दुसरीकडे, जर आपण Honda Shine बद्दल बोललो तर ते तुम्हाला फक्त 60 किमी मायलेज देते. म्हणूनच जर तुम्ही आलिशान बाईक घेण्याचा विचार करत असाल तर बजाजची ही मस्त बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!