New Business Idea : ‘या’ तंत्रज्ञानाद्वारे घराच्या छतावरच भाजीपाल्याची लागवड करून मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Business Idea : जर आपण घरबसल्या सुरु करता येणाऱ्या व्यवसायाच्या शोधात असाल तर आजची ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. आपल्याकडे घरातील टेरेसचा वापर सहसा कपडे वगैरे सुकवण्यासाठी आणि अनावश्यक वस्तू ठेवण्यासाठी केला जातो. जर आपल्या घराच्या टेरेसवर 500 ते 1000 स्क्वेअर फूटची जागा उपलब्ध असेल तर तिथे आपल्याला मायक्रोग्रीन फार्मिंग करता येईल. यासाठी मातीचा थर टाकण्याचीही गरज भासणार नाही.

Starting The Best Microgreens Business | Microgreens Farmer

सध्याच्या काळात लोकं आपल्या आरोग्याबाबत खूपच जागरूक झाले आहेत. ज्यामुळे सेंद्रिय खाद्यपदार्थाला मोठी मागणी आली आहे.मात्र ते सहजासहजी कुठेही मिळत नाही. जरी मिळाले तरी ते अत्यन्त महागड्या दराने विकले जाते. तर आपणही या संधीचा फायदा घेऊन याद्वारे कमी खर्चात दरमहा लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू शकाल. New Business Idea

Hay River, N.W.T., couple launches microgreens business | CBC News

टेरेसवर अशा प्रकारे करा भाजीपाल्याची लागवड

छतावर शेती करण्याच्या तंत्रज्ञानाला टेरेस फार्मिंग असे म्हंटले जाते. याद्वारे घराच्या छतावर माती न टाकताही सहजपणे शेती करता येते. यासाठी, टेबलच्या उंचीइतक्या कंटेनरमध्ये मातीचे लहान लहान बेड तयार केले जातात. त्यामध्ये मायक्रोग्रीन फार्मिंग करता येईल. ज्यामध्ये मोहरी, कोबी, अरगुला, पालक, मुळा, वॉटरक्रेस, वाटाणे, कोबी यांसारख्या 40 प्रकारच्या भाज्यांचा समावेश आहे. याच्या बिया सामान्य भाज्यांपेक्षा वेगळ्या असून याचे उत्पादनही लवकर होते. याशिवाय ते न शिजवता चटणी, लोणचे किंवा मसाल्यांसोबतही खाता येतील. New Business Idea

Micro Acres

माइक्रोग्रीन फार्मिंग फायदे जाणून घ्या

जर्नल ऑफ एग्रिकल्चरल अँड फूड केमिस्ट्रीच्या माहितीतनुसार, मायक्रोग्रीनमध्ये सामान्य भाज्यांपेक्षा 40 टक्के जास्त पोषक आणि जीवनसत्त्वे असतात. जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. याशिवाय ते 2 ते 4 आठवड्यांतच तयार होत असल्यामुळे या पिकाचे नुकसान होण्याचा धोकाही कमी असतो. तसेच, जमिनीशी संपर्क नसल्यामुळे यामध्ये कीटकांची शक्यता देखील नसते. New Business Idea

What Are Microgreens? | INTEGRIS Health

सातत्याने वाढते आहे मागणी

हे लक्षात घ्या कि, जगभरात सध्या मायक्रोग्रीनची मागणी झपाट्याने वाढते आहे. आरोग्याबाबत लोकांच्या जागृतीमुळे भविष्यात त्यांच्या मागणीत आणखी वाढ होणार आहे. मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या अनेक हाय प्रोफाइल कुटुंबांमध्ये त्याला सर्वाधिक मागणी आहे. याशिवाय बाजारात त्यांना सामान्य भाज्यांपेक्षा जास्त भाव देखील मिळतो. तसेच ग्रीन व्हेजिटेबल पॅकिंग बॉक्सच्या मदतीने ते आणखी आकर्षकहि बनवता येईल. अशा प्रकारे, 1000 चौरस फुटांच्या टेरेस द्वारे 1 लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळवता येईल. New Business Idea

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.manage.gov.in/fpoacademy/SGSchemes/maharashtra.pdf

हे पण वाचा :
Bank FD : खुशखबर !!! ‘ही’ स्मॉल फायनान्स बँक एफडीवर देत आहे 9.50% व्याजदर
Tax Saving Tips : ‘या’ 5 योजनांमध्ये गुंतवणूक करून वाचवा येईल टॅक्स, कसे ते जाणून घ्या
EPFO च्या ‘या’ योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला मिळतील 7 लाख रुपये
New Business Idea : घरबसल्या कमी खर्चात ‘हे’ व्यवसाय सुरू करून दरमहा मिळवा हजारो रुपयांचे उत्पन्न
Success Story : शालेय शिक्षण अर्धवटच सोडणारा ‘हा’ व्यक्ती बनला अब्जाधीश; स्थापन केली 16,500 कोटींची कंपनी